पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

अभिनेता विकी कौशलचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मे : लॉकडाऊनमुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या आपापल्या घरी आहेत. त्यामुळे सध्या सर्वजण सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. बरेच बॉलिवूड सेलिब्रेट त्यांच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेतच पण यासोबतचे त्यांचे काही अनसीन व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेता विकी कौशलचा सुद्धा असाच एक पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विकी कौशल पाणीपुरी खाताना दिसत आहे. पण यासोबतच त्यांनं मुंबईमध्ये पाणीपुरी कशी खाल्ली जाते याचं प्रात्यक्षिक सुद्धा दिलं आहे. विकीचा हा व्हिडीओ आताचा नाही तर जुना आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमध्ये हा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि विकी यामध्ये धम्माल करताना दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विकी कौशल राहत असलेल्या एका बिल्डिंगमध्ये कोरोना संक्रमित पेशंट मिळाल्याचं बोललं जात होतं. या केसनंतर विकी राहत असलेल्या ओबेरॉय स्प्रिंग्स या सोसायटीचा काही भाग सील करण्यात आला होता. विकीची ही बिल्डिंग अंधेरी वेस्टला आहे. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार अंधेरी वेस्टमधील ओबेरॉय स्प्रिंग्स हा भाग कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बिल्डिंगमध्ये विकी कौशल व्यतिरिक्त चित्रांगदा सिंह, राजकुमार राव, पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभ‍िषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, डायरेक्टर आनंद एल राय, विपुल शाह, प्रभु देवा, फिल्ममेकर-कोरियोग्राफर अहमद खान, अर्जन बाजवा, टीवी अभिनेत्री चाहत खन्ना यांच्यासारखे सेलिब्रेटी राहतात.

(संपादन- मेघा जेठे.)

'खतरों के खिलाडी' फेम शिवीन नारंग हॉस्पिटलमध्ये, वाचा काय आहे कारण

फेलोशिपमधून शिक्षण घेतलेल्या इरफानने मृत्यूनंतर मागे ठेवली इतकी संपत्ती

First published: May 5, 2020, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading