फेलोशिपमधून शिक्षण घेतलेल्या इरफानने मृत्यूनंतर मागे ठेवली इतकी संपत्ती

फेलोशिपमधून शिक्षण घेतलेल्या इरफानने मृत्यूनंतर मागे ठेवली इतकी संपत्ती

शिष्यवृत्तीतून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर संघर्ष करत चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण कऱणाऱ्या इरफानने कमावली इतकी संपत्ती...

  • Share this:

मुंबई, 4 मे : बॉलिवूड अभिनेता इरफान खाननं वयाच्या 54 व्या वर्षी जगाला अलविदा केलं. त्याच्या या एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूडचा हिरो होण्यासाठी असलेल्या पिळदार बॉडी गुड लुकिंग अशा मापदंडांना खोटं ठरवत केवळ टॅलेंट आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर इरफाननं केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सुद्धा जिंकलं. इरफानने जगाचा निरोप घेतला तरीदेखील त्याच्या चित्रपटांमधून, अभिनयामधून तो आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. अर्थात टीव्ही पासून सुरुवात करुन हॉलिवूडपर्यंत मजल मारणाऱ्या या अभिनेत्यानं आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती ठेवली असेल अशी उत्सुकताही अनेकांच्या मनात आहे.

'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, इरफान खान त्याच्या कुटुंबीयांसाठी जवळपास 320 कोटींची संपत्ती ठेवून गेल्याचं म्हटलं जातं. यामध्ये त्याची वैयक्तीक गुंतवणूक, जुहूमधील फ्लॅट आणि मुंबईमधील आणखी एक घर, लक्झरी कार अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. त्याने 110 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली होती. तसंच त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये 4-5 कोटी किंमतीच्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

'माझ्या गर्लफ्रेंडशी फ्लर्ट केलंस तर..' अनुष्काच्या फॅनला अभिनेत्यानं दिली धमकी

दरम्यान इरफान एका चित्रपटासाठी जवळापास 15 कोटीं रुपयांचं मानधन घेत होता. तर जाहिरातींसाठी तो 5 कोटी रुपये एवढी फी घेत असे. विशेष म्हणजे सर्वाधिक आयकर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये त्याचं नाव होतं. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या इरफानने हॉलिवूडपर्यंत बाजी मारली होती.

2018 मध्ये इरफानला न्यूरोएन्डोक्राईन टय़ुमर हा आजाराचं निदान झालं होतं. त्यावेळी त्याच्यावर लंडनमध्ये उपचारही सुरु होते. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर दीड-दोन वर्षांनी तो मुंबईत परतला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी पासून त्याची तब्येत पुन्हा खालावत गेली. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचं जयपूरमध्ये निधन झालं आणि त्यानंतर बरोबर तीन दिवसांनी इरफान खानने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण...

First published: May 4, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या