काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर शिवीनला घरी सोडण्यात येईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोना पेशंट सापडल्यानं शिवीन राहत असलेली बिल्डिंग सील करण्यात आली होती. शिवीन सध्या मुंबईमध्ये एकटा राहत आहे. त्याचे आई-वडील लॉकडाऊनमुळे दुसरीकडे अडकले आहेत.
शिवीन नारंग 'बेहद 2' या मालिकेमुळे बराच चर्चेत राहिला होता. मात्र लॉकडाऊनमुळे सोनी टीव्हीनं ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत शिवीन अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या अपोझिट दिसला होता. याशिवाय त्यानं यंदाच्या खतरों के खिलाडीच्या सीझनमध्येही भाग घेतला होता. त्याचा हा प्रवास सुद्धा चर्चेत राहिला होता. एवढंच नाही तर या दरम्यान तो अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशला डेट करत असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र नंतर या केवळ अफवा असल्याचं स्वतः तेजस्विनीनं स्पष्ट केलं. (संपादन- मेघा जेठे) हिना खानने केली 'लॉकडाऊन देवतां'ची पूजा, VIDEO पाहून हसू नाही आवरणार आराध्यानं असे मानले कोरोना योद्ध्यांचे आभार, ऐश्वर्या रायने शेअर केला PHOTO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus