जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पिझ्झा बर्गर खाऊन वेटलॉस; विक्की कौशलचं अतरंगी डाएट ऐकून बिग बींही हैराण

पिझ्झा बर्गर खाऊन वेटलॉस; विक्की कौशलचं अतरंगी डाएट ऐकून बिग बींही हैराण

विक्की कौशल

विक्की कौशल

कोन बनेगा करोडपतीच्या मंचावर विक्कीनं त्याचं सिक्रेट बिग बींना सांगितलं. हे ऐकून बिग बी देखील अवाक झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर : बॉलिवूडचा चार्मिग अभिनेता विक्की कौशल हा लाखो तरुणींच्या मनावर राज्य करतोय. विक्की कौशलनं त्याचा फिटनेस देखील व्यवस्थित मेंटेन केला आहे. पंजाबी मुलगा असलेला विक्की वेगवेगळे पदार्थ खाण्याचा शॉकिन आहे. विक्की पंजाबी असल्यानं पंजाबी फूड आवडत असेल असा सर्वांचा समज असेल पण हा समज स्वत: विक्की कौशलनं दूर केला आहे. पंजाबी असला तरी विक्कीला इटालियन पदार्थ प्रचंड आवडतात. बर्गर पिझ्झा त्याला खूप आवडतात आणि हेच खाऊन त्यानं वजन कमी केलं. कोन बनेगा करोडपतीच्या मंचावर विक्कीनं त्याचं सिक्रेट बिग बींना सांगितलं. हे ऐकून बिग बी देखील अवाक झाले. केबीसीचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आठवड्यात केबीसीच्या मंचावर अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी खेळ खेळताना विक्कीनं आपली एक विचित्र गोष्ट बिग बींना सांगितली. विक्कीला एका भयंकर समस्या आहे जी ऐकून बिग बींना देखील विश्वास बसला नाही. विक्की म्हणाला, सर माझ्याकडे एक चांगली अडचण आहे. माझं वजन वाढत नाही सर.  मी बर्गर पिझ्झा खाऊन माझं वजन कमी करू शकतो.  विक्कीचं बोलणं ऐकून बिग बी हैराण झाले. हेही वाचा - Bigg Boss 16: बिग बॉस 16 च्या फिनालेमधून सलमान खानची एक्झिट?; हा सेलिब्रिटी घेणार भाईजानची जागा

जाहिरात

विक्कीच्या या वाक्यावर बिग बींनी त्याला विचारलं मग वजन वाढवण्यासाठी तू काय करतोय? त्यावर विक्की म्हणाला, मग सर मला खूप बोरिंग जेवण घावं लागतं. ज्यात सगळे ग्रील पदार्थ असतात. लोक जीममध्ये वजन कमी करण्यासाठी जातात पण मला जीमध्ये वजन वाढवण्यासाठी जावं लागतं.  विक्कीचं बोलणं ऐकून उपस्थित सगळ्यांना हसू आलं. त्यावर बिग बी म्हणाले, हे सगळं खूप उलटं आहे. त्यावर विक्की म्हणाला, हो पण पंजाबी लोकांसाठी हा खूप चांगला प्रोब्लेम आहे. अभिनेता विक्की कौशल सध्या बायको कतरिनाबरोबर राजस्थान ट्रिपला गेला आहे. दोघांचे फोटो त्यांनी शेअर केलेत. विक्की आणि कतरिना यांच्या लग्नाला काही दिवसांआधीच 1वर्ष पूर्ण झालं आहे. दोघांचं लग्न देखील राजस्थानच्या 200 वर्ष जुन्या किल्ल्यावर झालं आहे. लग्नाच्या एक वर्षांनंतर दोघांनी पुन्हा एकदा एकत्र वेळ घालवण्यासाठी राजस्थानची निवड केली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात