मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिना कैफचा दीर या मराठी मुलगीला करतोय DATE? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

कतरिना कैफचा दीर या मराठी मुलगीला करतोय DATE? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. यामध्ये काही आपल्या रिलेशनशिपला सर्वांसमोर व्यक्त करतात. तर काही त्याला सीक्रेट ठेवतात.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. यामध्ये काही आपल्या रिलेशनशिपला सर्वांसमोर व्यक्त करतात. तर काही त्याला सीक्रेट ठेवतात.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. यामध्ये काही आपल्या रिलेशनशिपला सर्वांसमोर व्यक्त करतात. तर काही त्याला सीक्रेट ठेवतात.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 31 डिसेंबर-   अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif) आणि विकी कौशल   (Vicky Kaushal) यांच्या लग्नानंतर आता विकीचा भाऊ सनी कौशल   (Sunny Kaushal)  चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनी आणि शर्वरी वाघ   (Sharvari Wagh)  एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान शर्वरी वाघ कतरिना आणि विकीच्या लग्नात त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यक्रमांत सहभागी झाली होती. त्यानंतर या चर्चांना आणखीन जोर चढला होता. आता या विषयावर स्वतः अभिनेत्री शर्वरी वाघने प्रतिक्रिया दिली पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलं आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. यामध्ये काही आपल्या रिलेशनशिपला सर्वांसमोर व्यक्त करतात. तर काही त्याला सीक्रेट ठेवतात. परंतु तरीही काहीप्रमाणात कॅमेरात या जोड्या कैद झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण येतं. असंच काहीसं झालं आहे, अभिनेत्री शर्वरी वाघ आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशलच्या बाबतीत. या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिलं जातं. त्यामुळे सर्वांना या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे असंच वाटतं. या सर्वांवर आता अभिनेत्री शर्वरी वाघने प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया डॉट कॉमला दिलेल्या एका मुलाखतीत शर्वरीने म्हटलं आहे, 'मी आणि सनीने चार वर्षांपूर्वी 'द फॉरगॉटन आर्मी' मध्ये काम केलं होतं'.

ती पुढं म्हणाली, 'त्यावेळी आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. तेव्हापासून आम्ही असंच राहतो. सनी मी आणि कबीर खान सर आम्ही फारच छान मित्र बनलो होतो. आमच्यामध्ये फार घट्ट बॉन्डिंग झालं होतं. सनीसोबत रिलेशनशिपवर बोलताना शर्वरी म्हणाली, 'या सगळ्या आधीही अफवाच होत्या. आणि आतासुद्धा अफवाच आहेत. काही लोकांसोबत तुमची आयुष्यभरासाठी मैत्री होते. आणि तुम्ही ती जगाला दाखवायला मूळीच लाजत नाही'. तसेच ती म्हणाली, 'या सर्व अफवांमुळे मी जगणं नाही सोडू शकत. मी इंडस्ट्रीमध्ये ही लोकं मिळवली आहेत. आणि मी नेहमीच त्यांच्यासाठी उपस्थित असेन. शर्वरी कतरिना आणि विकीच्या लग्नात त्यांच्या कुटुंबासोबतच होती. त्यामुळे या चर्चांना जोर चढला होता.

(हे वाचा:मी वेळ वाया घालवला', सुष्मितानं सांगितलं रोहमनसोबतच्या ब्रेकअपचं कारण)

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत बोलताना शर्वरी म्हणाली, 'हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं होतं. फोटोंमध्ये हे लग्न जितकं सुंदर आणि भव्य वाटत होतं. रिअलमध्येसुद्धा ते तसंच होतं. लग्नातील प्रत्येक गोष्ट फारच सुंदर आणि पवित्र होती. हे सर्वकाही एखाद्या सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं.शर्वरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नुकताच बंटी आणि बबलीमध्ये काम केलं आहे. यामध्ये तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाचं फारच कौतुक झालं होतं.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal