मुंबई, 30 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप करून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिनं काही दिवसांपूर्वी रोहमनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत म्हणाली होतेकी, आता आम्ही दोघे चांगले मित्र राहणार आहे. मात्र तिनं ब्रेकअपचे कारण आजपर्यंत स्पष्ट केलेले नाही. आता सुष्मिता पुन्हा एकदा ब्रेकअपवर बोलली आहे.
सुष्मिताने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पब्लिक फिगर असल्यामुळे तिच्याशी संबंधित व्यक्तीही लोकांच्या नजरेत येतो. हे त्याच्यासाठी पण योग्य नाही आणि स्वत:साठी देखील योग्य नाही. आपण रिलेशनशिपमध्ये आहोत त्यामुळे एखाद्याच्या भावनांशी जोडले जाणे आयुष्यासाठी योग्य नसल्याचे तिनं म्हटलं आहे.
सुष्मिता पुढे म्हणाले की, दोघांनीही आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे. मैत्रीही कायमची राहते. आता या वयात मी जर एका जागी बसून माझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांबद्दल विचार करत राहिले. तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवला आहे.
वाचा-शिल्पाच्या मुलाने मीडियासमोर मास्क काढण्यास दिला नकार, मग झालं असं..
सुष्मिता प्रत्येक नात्यातून काही शिकले पाहिजे
सुष्मिताने रिलेशनशिपमधून तिला काय शिकायला मिळाले हेही सांगितले. मी प्रत्येक नात्यातून काहींना काही शिकल्याचे तिनं यावेळी सांगितलं.मी जर कुणावर प्रेम केले तर ते 100 टक्के करते.म्हणून, जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतो तेव्हा पूर्णपणे वेगळे व्हायचे. आयुष्यात कुठल्याच गोष्टीला रिपीट मोड नाही. तुमच्या विभक्त होण्याचे कारण काहीही असो, पण जेव्हा तुम्ही खऱ्यापणे वेगळे होतात तेव्हा तुमची मैत्री टिकून राहते.
रोहमन सुष्मिताच्या कुटुंबाच्या जवळ होता
इन्स्टावर सुष्मिता आणि रोहमन यांच्यात संवाद सुरू झाला. 2018 मध्ये ते एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर रोहमन सुष्मिताच्या कुटुंबाच्या जवळ आला. अनेकवेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आला आहे. मात्र नुकतेच तिनं ब्रेकअप झाल्याबद्दल एक पोस्ट लिहिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.