मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नानंतर विराट-अनुष्काचे शेजारी होतील विक्की-कतरिना, महिन्याचं भाडं पाहून चाट पडाल

लग्नानंतर विराट-अनुष्काचे शेजारी होतील विक्की-कतरिना, महिन्याचं भाडं पाहून चाट पडाल

कतरिना आता आपली बेस्ट फ्रेंड अनुष्का शर्माची शेजारी राहायला येणार आहे.

कतरिना आता आपली बेस्ट फ्रेंड अनुष्का शर्माची शेजारी राहायला येणार आहे.

कतरिना आता आपली बेस्ट फ्रेंड अनुष्का शर्माची शेजारी राहायला येणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 9 नोव्हेंबर : विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोघांचं लग्न डिसेंबर (Katrina Vicky Wedding Venue) महिन्यात होणार असल्याचं वृत्त आहे. यादरम्यान आणखी एक अपडेट समोर आली आहे.

दाम्पत्य लग्नानंतर नव्या घराचा शोध घेत आहेत. जुहूच्या या घरासाठी विक्की मोठी रक्कम मोजत आहे. सांगितलं जात आहे की, विक्की आणि कतरिना बऱ्याच वेळापासून घराचा शोध घेत होते. आता त्यांना आपलं स्वप्नांचं घर मिळालं आहे. दोघांनी जुहूमध्ये एक लग्जरी अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतलं आहे. या अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीदेखील राहतात. यासोबत कतरिना आता आपली बेस्ट फ्रेंड अनुष्का शर्माची शेजारी राहायला येणार आहे.

हे ही वाचा-कतरिना-विकीची लगीनघाई; कबीर खानच्या घरी पार पडला 'रोका'

किती आहे नव्या घराचं भाडं?

रियल इस्टेट पोर्टल सांभाळणारे वरूण सिंग यांनी इंडिया टुडेला याबाबत सांगितलं की, विक्की कौशलने जुहूमधील राजमहल अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेतलं आहे. ही एक अल्ट्रा लग्जरी बिल्डींग आहे. त्यांनी जुलै महिन्यात या बिल्डींगच्या आठव्या माळ्यावरील एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं होतं.

वरुण यांनी पुढे सांगितलं की, विक्कीने सिक्युरिटी डिपॉजिट स्वरुपात 1.75 लाख रुपये भरले आहेत. सुरुवातील 36 आठवड्यांसाठी ते प्रत्येक महिन्याला 8 लाख रुपयाचं भाडं देतील. यानंतर पुढील 12 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 8.40 लाख रुपये आणि त्यानंतर 12 महिन्यांसाठी विक्ती कौशल प्रत्येक महिन्याला 8.82 लाख रुपये भाडं देणार आहे.

कबीर खानच्या घरी झाला होता रोका

कतरिना कैफच्या एका मित्राने सांगितलं की, विकी आणि कतरिना यांचा रोका झाला असून दिग्दर्शक कबीर खानच्या (Kabir Khan) घरी हा सोहळा पार पडला.  कबीर खान आणि कतरिना कैफ यांनी 'एक था टायगर'मध्ये सोबत काम केलेलं आहे. कतरिना कैफ कबीन खानला आपला भाऊ मानते. फक्त कुटुंबातील सदस्य हजर असलेला हा सोहळा अगदी गोपनीय ठेवण्यात आला होता. कतरिनाची आई सुझॅन, बहीण इसाबेल कैफ, विकी कौशलचे वडील शाम कौशल, वीणा कौशल आणि भाऊ हे सोहळ्याला हजर होते.

First published:

Tags: Bollywood actor, Katrina kaif, Vicky kaushal, Wedding