मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कतरिना-विकीची लगीनघाई; कबीर खानच्या घरी पार पडला 'रोका'

कतरिना-विकीची लगीनघाई; कबीर खानच्या घरी पार पडला 'रोका'

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा 'रोका' समारंभ पार पडला आहे. रोका हा साखरपुड्याआधीचा एक विधी असतो ज्यामध्ये भेटी दिल्या जातात आणि लग्न पक्कं केलं जातं.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा 'रोका' समारंभ पार पडला आहे. रोका हा साखरपुड्याआधीचा एक विधी असतो ज्यामध्ये भेटी दिल्या जातात आणि लग्न पक्कं केलं जातं.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा 'रोका' समारंभ पार पडला आहे. रोका हा साखरपुड्याआधीचा एक विधी असतो ज्यामध्ये भेटी दिल्या जातात आणि लग्न पक्कं केलं जातं.

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. अगदी कतरिना-विकीच्या कपड्यांपासून ते लग्नाच्या व्हेन्यूबाबतच्यादेखील (Katrina Vicky Wedding Venue) चर्चा रंगत आहेत. मात्र, आतापर्यंत लग्नाच्या चर्चांना दोघांनीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण आता नव्यानं समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा 'रोका' समारंभ पार पडला आहे. रोका हा साखरपुड्याआधीचा एक विधी असतो ज्यामध्ये भेटी दिल्या जातात आणि लग्न पक्कं केलं जातं.

इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कतरिना कैफच्या एका मित्राने सांगितलं की, विकी आणि कतरिना यांचा रोका झाला असून दिग्दर्शक कबीर खानच्या (Kabir Khan) घरी हा सोहळा पार पडला.  कबीर खान आणि कतरिना कैफ यांनी 'एक था टायगर'मध्ये सोबत काम केलेलं आहे. कतरिना कैफ कबीन खानला आपला भाऊ मानते. फक्त कुटुंबातील सदस्य हजर असलेला हा सोहळा अगदी गोपनीय ठेवण्यात आला होता. कतरिनाची आई सुझॅन, बहीण इसाबेल कैफ, विकी कौशलचे वडील शाम कौशल, वीणा कौशल आणि भाऊ हे सोहळ्याला हजर होते. विकी आणि कतरिनाच्या एका जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार, 'रोका' सोहळा अतिशय सुंदर पद्धतीनं पार पडला. रोषणाई आणि सजावटीत कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. दिवाळीच्या काळात शुभ मुहूर्त असल्यानं दोन्ही कुटुंबांनी रोका उकरून घेतला. दिग्दर्शक कबीर खान आणि मिनी खान हे कतरिनाच्या कुटुंबासारखे आहेत. त्यामुळं त्यांनी हा सोहळा आपल्या घरी आयोजित केला, असा खुलासा कतरीना आणि विकाच्या मित्रानं केला आहे.

हे ही वाचा-PHOTOS: प्रियांका चोप्रानं पती निकसोबत खरेदी केलं नवं घर! नव्या घरात झालं दिवाळी

विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर 2021मध्ये लग्न करणार आहेत. दोघेही आपापल्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे त्यांनी हनिमूनचा प्लॅन पुढे ढकलला आहे. कतरिना कैफ लग्नानंतर 'टायगर 3' चं शूटिंग सुरू करणार आहे, तर विकी कौशल 'सॅम माणेकशॉ, सॅम बहादूर'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

सर्वत्र, कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या चर्चा रंगत असल्या तरीही त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. दोघांनीही अद्याप लग्नाची तारीख कोणालाच सांगितलेली नाही. मात्र, सातत्यानं लग्नाच्या बातम्या मीडियामध्ये लीक होत असल्यानं दोघेही अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे.

First published:

Tags: Katrina kaif, Vicky kaushal, Wedding