मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: हॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच वरुण झाला आऊट ऑफ कंट्रोल, स्टेजवर सगळ्यांसमोरच केलं ते कृत्य

VIDEO: हॉलिवूड अभिनेत्रीला पाहताच वरुण झाला आऊट ऑफ कंट्रोल, स्टेजवर सगळ्यांसमोरच केलं ते कृत्य

वरुण धवन

वरुण धवन

वरुण धवनचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये वरुणने हॉलिवूड अभिनेत्रीसोबत केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल :  नुकताच नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोन दिवस बॉलिवूडच्या जवळजवळ सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली  होती. बॉलिवूडचं काय पण हॉलिवूडच्या कलाकारांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. सगळ्यांच्याच उपस्थितीने सिनेप्रेमींचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच वरुण धवनचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये वरुणने हॉलिवूड अभिनेत्रीसोबत केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन या ना त्या कारणामुळे चांगलाच चर्चेत असतो. वरुण धवनची वविविध अभिनेत्रींसोबत केमिस्ट्री सगळ्यांनाच माहित आहे. त्याचा स्वभाव एकदम मनमोकळा आहे. त्याच्या याच खुल्लमखुल्ला स्वभावामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला  अनेक हॉलिवूड स्टार्सनी देखील हजेरी लावली. अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदही या कार्यक्रमाला उपस्थित होती. वरुणने त्याच्या परफॉर्मन्स दरम्यान गिगीला हाताला धरून स्टेजवर आणलं. ती स्टेजवर येताच त्याने तिला उचललं आणि गोल फिरवलं. इतकंच नाही तर त्याने तिला गालावर किसही केलं. त्याचा हा अंदाज पाहून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे.

ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला हा अभिनेता; 4 वर्षानंतर असा झाला नात्याचा शेवट

वरुण धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्यावर या हॉलिवूड अभिनेत्रीला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याचा आणि तिला जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप लावला जात आहे. चहुबाजुंनी ट्रोल होत असताना आता वरुणने ट्विट करत घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

वरुण धवनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मला वाटतं की आज तुम्ही मला ट्रोल करायचं ठरवलंच आहे. पण घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सांगायचं कि हे सगळं आधीच नियोजित होतं. स्टेजवर जे काही घडलं, ते त्या सगळ्याची कल्पना अभिनेत्रीला आधीपासूनच देण्यात आली होती. त्यामुळे मला नावं ठेवण्याऐवजी दुसरी एखादी समस्या शोधा. शुभ सकाळ.'' अशा शब्दात वरुणने त्याचं मत व्यक्त केलं आहे.

गिगी हदिद ही डच-पॅलेस्टाइन मॉडेल आहे. जेलेना नौरा हदिद असं तिचं नाव आहे. लॉस एंजिलिसमध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं. तिने आजवर अत्यंत प्रतिष्ठित फॅशन शोजमध्ये हजेरी लावली असून प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Varun Dhawan