मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला हा अभिनेता; 4 वर्षानंतर असा झाला नात्याचा शेवट

ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला हा अभिनेता; 4 वर्षानंतर असा झाला नात्याचा शेवट

हर्षद अरोरा

हर्षद अरोरा

अनेक कलाकार आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडतात. काही जण या नात्यात यशस्वी होतात तर काहींचं नातं शेवट्पर्यंत टिकत नाही. असंच काहीसं छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडलं आहे. विशेष म्हणजे चक्क मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्याच प्रेमात तो पडला होता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल :  मालिकांच्या सेटवर शूटिंगदरम्यान प्रेमात पडणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक कलाकार आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडतात. काही जण या नात्यात यशस्वी होतात तर काहींचं नातं शेवट्पर्यंत टिकत नाही. असंच काहीसं छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडलं आहे. तो मालिकेतील सहकलाकाराच्या प्रेमात पडला पण ४ वर्षानंतर या दोघांचा ब्रेकअप झालं. विशेष म्हणजे चक्क मालिकेत त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्याच प्रेमात तो पडला होता. आता ब्रेकअप नंतर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

दहलीज, तेरा क्या होगा आलिया आणि सुपरकॉप्स यांसारख्या मालिकांमध्ये काम करणारा टीव्ही अभिनेता हर्षद अरोरा सध्या सिंगल आहे. अलीकडेच हर्षदचे त्याची गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री अपर्णा कुमारसोबत ब्रेकअप झाले होते. अपर्णाने 2018 च्या टीव्ही मालिका मायावी मलंगमध्ये हर्षदच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली होती. या मालिकेतूनच दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. हर्षद त्याच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे बोलला आहे.

Salman Khan: प्रसिद्ध अभिनेत्रीनं उलगडलं सलमान खानचं 'ते' गुपित; म्हणाली 'तो रात्री सिनेमाच्या सेटवर...'

2022 मध्ये मे महिन्यात हर्षद आणि अपर्णा वेगळे झाले. दोघे जवळपास 4.5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. नाते तुटल्यानंतर हर्षदने आपली व्यथा मांडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीनंतर हर्षद अरोरा यांनी सांगितले की, 'कधीकधी नातेसंबंध आपल्या अपेक्षेप्रमाणे जात नाहीत. आता  मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नात्यासाठी खूप वेळ आणि जबाबदाऱ्या घ्यावा लागतात. मला सध्या माझ्या कामाशिवाय इतर कशाचाही विचार करायचा नाही. माझ्यात आणि अपर्णामध्ये अनेक गोष्टींवर मतभेद होते. त्यामुळेच आम्ही दोघांच्या संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

तो पुढे म्हणाला कि, 'आम्ही नेहमीच चांगले मित्र राहू आणि जोपर्यंत आमचे नाते टिकले तोपर्यंत आम्ही खूप आनंदी होतो.' हर्षद आणि अपर्णा यांच्या नात्याची सुरुवात सुमारे 4 वर्षांपूर्वी शूटिंग सेटपासून झाली होती. हर्षदची अपर्णाशी मैत्री झाली. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही जवळपास ४ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिले.

यानंतर दोघेही वेगळे झाले. अपर्णाही तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. अपर्णाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'जवळपास 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आमच्यात मतभेद निर्माण होऊ लागले. मी शांत स्वभावाची व्यक्ती आहे. मतभेद झाल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोललो आणि परस्पर संमतीने संबंध संपवले. आम्ही ज्या प्रकारे विचार केला त्या पद्धतीने आमच्यामध्ये गोष्टी घडल्या नाहीत. पण आम्ही वेगळे झालो आहोत आणि आनंदी आहोत.' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv actor, Tv actress