मुंबई, २५ जून- बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीचं सिनेकरिअर जरी सुसाट पळत नसलं तरी त्याचं खासगी आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत असतं. आफताबने वयाच्या ३८ व्या वर्षी निन दुसांजशीच दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. ५ जून रोजी दोघांनी लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. आज आफताब ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या रॉयल वेडिंगचे काही फोटो दाखवणार आहोत. आफताबने आपल्या आणि निनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. पण २०१७ मध्ये दोघांनी पुन्हा एकदा थाटामाटात लग्न केलं. दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केलं आणि अखेर २०१४ मध्ये लग्न केलं. निन दुसांज ही ब्रिटीश- इंडियन आहे. याशिवाय निन ही कबीर बेदीची तिसरी पत्नी परवीन दुसांजची बहीण आहे. बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!
हिमाचल प्रदेशमध्ये शूटिंगदरम्यान एकमेकांसोबत असा वेळ घालवतात सारा- कार्तिक वर्ष १९९९ मध्ये आफताब शिवदासानीने वयाच्या १९ व्या वर्षी रामगोपाल वर्माच्या मस्त सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात त्याच्यासोबत उर्मिला मातोंडकरची मुख्य भूमिका होती. मस्त सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. पण यानंतर आफताबच्या करिअरने फारसा वेग घेतला नाही. त्याला सहाय्यक अभिनेत्याच्याच भूमिका मिळत राहिल्या.
आफताबचे सिनेमे एकामागोमाग एक फ्लॉप होत गेले आणि नंतर त्याला अडल्ट कॉमेडी सिनेमांमध्ये काम करावं लागलं. भलेही आफताबचं फिल्मी करिअर यशस्वी ठरलं नसेल तरी त्याचं प्रोडक्शन हाउस आणि दुसऱ्या इवेंट्समधून वर्षाला चांगली कमाई करतो. राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल