जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...जेव्हा जखमी झालेल्या वरुणचा बाबा डेव्हिड धवन यांनी सेटवर सर्वांदेखत केला अपमान

...जेव्हा जखमी झालेल्या वरुणचा बाबा डेव्हिड धवन यांनी सेटवर सर्वांदेखत केला अपमान

...जेव्हा जखमी झालेल्या वरुणचा बाबा डेव्हिड धवन यांनी सेटवर सर्वांदेखत केला अपमान

एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान वरुणच्या पायाला गंभीर दुखापत सुद्धा झाली होती आणि त्याचे वडील मात्र त्याच्यावर जोरात ओरडून त्याचा अपमान करत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मे : बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची इडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख आहे. अनेक हिट सिनेमा देणाऱ्या डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण सुद्धा आता बॉलिवूडच्या आघडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एरवी सगळीकडे बेस्ट वडील-मुलाची जोडी म्हणून चर्चेत असणाऱ्या वरुण आणि डेव्हिड यांचं सेटवरील नातं मात्र वडील आणि मुलासारखं अजिबात नसतं. कामाच्या बाबतीत डेव्हिड धवन खूपच काटेकोर आहेत. त्यांच्या प्रोफेशनल डेडिकेशनचा एक किस्सा वरुणनं एका मुलाखतीत शेअर केला. एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान वरुण एक बाइक स्टंट करत होता मात्र बाइक चालवताना तो खाली पडला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत सुद्धा झाली होती. अशा परिस्थितीत शूटिंग थांबवलं गेलं आणि वरुणच्या पायाला बर्फ लावला जात होता. तो वेदनांनी कळवळत होता. अशात सेटवर असलेले त्याचे वडील डेव्हिड धवन माइकवर जोरजोरत ओरडू लागले, ‘अरे कोण आहे हा हिरो… हा हिरो नाही आहे… सेटवर रडतोय… चला याला इथून बाहेर काढा…’ वरुणला त्यांचं हे बोलण ऐकून खूप वाइट वाटलं. राग सुद्धा आला. वडील असून त्यांना आपल्या वेदना समजत नाही असा वरुणचा समज झाला. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणानं सोनू सूदकडे मागितली मदत, मिळालं धम्माल उत्तर

जाहिरात

वरुण सांगतो, नंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की, ते तर फक्त त्यांचं काम करत होते. जेव्हा ते सेटवर होते तेव्हा ते फक्त त्याचे वडील नाही तर ते एक दिग्दर्शक सुद्धा होते. या घटनेनंतर समजलं की त्याचे वडील त्यांच्या कामाप्रती किती गंभीर आणि प्रामाणिक आहेत. ते आपल्या मुलाशी सुद्धा तसेच वागले जसे ते एखाद्या नवोदित अभिनेत्याशी वागतात.

वरुण धवननं वडील डेव्हिड धवन यांच्यासोबत ‘हिरो’ आणि ‘जुडवा 2’ या दोन सिनेमात काम केलं आहे. अर्थात या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता पुन्हा एकदा वरुण धवन आणि डेव्हिड धवन ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. या सिनेमातून सारा अली खान आणि वरुण धवन ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ऐश्वर्यापासून दूर राहा…’ संजय दत्तला त्याच्या बहिणींनी दिली होती धमकी दीपिकानं Live Chat मध्ये रणवीरला केलं ‘एक्सपोज’, पुढे काय झालं पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात