गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणानं सोनू सूदकडे मागितली मदत, अभिनेत्यानं दिलं धम्माल उत्तर

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणानं सोनू सूदकडे मागितली मदत, अभिनेत्यानं दिलं धम्माल उत्तर

सोनू सूद मागच्या काही दिवसांपासून तो मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : कठीण काळात जो व्यक्ती आपल्या मदतीला येतो तो देवासमान असतो असं म्हणतात. कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदत केली मात्र बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मात्र लोकांना अन्न पुरवण्यापासून ते मुंबईमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत मदत करताना दिसत आहे.

मागच्या काही दिवसांपासून सोनू सूद त्याच्या कामामुळे सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर ट्वीटरद्वारे अनेकांनी सोनू सूदकडे मदत मागितली आणि त्यानं ती कोणालाच निराश केलं नाही. सध्या सोनू सूद जेवढ्या लोकांना शक्य आहे त्यांना मदत करताना दिसत आहे. पण लोक केवळ घरी परतण्यासाठी नाही तर कोणी दारूसाठी तर कोणी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी सोनू सूदकडे मदत मागताना दिसत आहेत.

विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेशचा डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

नुकतच एका बिहारी तरूणानं सोनू सूदला ट्वीट केलं आणि या ट्वीटमध्ये त्यानं गर्लफ्रेंडची भेट घालून देण्याची मागणी केली. त्यानं लिहिलं, 'सोनू सूद भैय्या मला मला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे मदत करा.' विशेष म्हणजे सोनू सूदनं त्याचं ट्वीट टाळलं नाही. त्यानं थोड्या मजेदार अंदाजात त्याला उत्तर दिलं, 'थोडे दिवस गर्लफ्रेंडपासून दूर राहून बघ, खऱ्या प्रेमाची परीक्षा सुद्धा होऊन जाईल' यासोबत त्यानं हसणारा इमोजी पोस्ट केला.

या आधीही एका व्यक्तीनं सोनू सूदकडे दारूच्या दुकानाकडे पोहोचवण्याची मागणी करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. बुल्ला भाई नावाच्या एका अकाउंटवरून या व्यक्तीनं सोनूला टॅग करत ट्वीट केलं, सोनू भाई मी माझ्या घरात अडकलो आहे. मला माझ्या ठेक्यापर्यंत पोहोवा. आतापर्यंत लोकांनी केलेल्या मागण्यामध्ये ही सर्वात अत्रंगी मागणी होती. मात्र सोनूनं सुद्धा या युजरला सडेतोड उत्तर दिलं. त्यानं रिप्लाय दिला, 'मी तुला ठेक्यापासून घरापर्यंत पोहोचवू शकतो गरज पडली तर सांग'

सोनू सूद सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून तो मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजूरांना तो त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करताना दिसत आहे. सोनू सूद मागच्या काही दिवसांपासून त्याच्या ट्वीटरवर खूप सक्रिय आहे. यावरुन मिळालेल्या मेसेजच्या माध्यमातून तो अनेकांना मदत करताना दिसत आहे आणि त्याच्या या कामासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं होतं.

प्रियांकनं शहिद जवानांना वाहिली श्रद्धांजली, शेअर केला वडिलांचा Throwback Photo

देवोलिना भट्टचार्जीविरोधात सायबर क्राइमची तक्रार दाखल, वाचा काय आहे प्रकरण

First published: May 26, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading