मुंबई, 26 मे : संजय दत्त आणि ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतली दोन प्रसिद्ध नावं आहेत. दोघांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं. अनेक हीट सिनेमा दिले. पण ही जोडी पहिल्यांदा ‘शब्द’ या सिनेमात एकत्र दिसली होती आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. मात्र हा सिनेमा येण्याआधी या जोडीनं एक मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं होतं. पण या फोटोशूटला जाण्याआधी संजय दत्तच्या बहिणींनी त्याला ऐश्वर्यापासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली होती. याचा खुलासा स्वतः संजय दत्तनं एका मुलाखतीत केला. ही गोष्ट आहे 1993 मधली. ज्यावेळी ऐश्वर्यांनं हिंदी सिनेमात पाऊल सुद्धा ठेवलं नव्हतं. तेव्हा ती केवळ एक मॉडेल म्हणून काम करत होती आणि तिनं मिस वर्ल्डचा किताब सुद्धा जिंकला नव्हता. त्यावेळी संजय दत्त आणि ऐश्वर्या राय एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट करत होते. याच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत संजयनं सांगितलं होतं की, ऐश्वर्यांला पेप्सीच्या जाहिरातीत पाहिल्यावरच तो तिच्यावर लट्टू झाला होता. या मुलाखतीत संजयनं सांगितलं, की त्याच्या दोन्ही बहिणी प्रिया आणि नम्रता यांना ऐश्वर्या खूप आवडायची. त्यांना ती खूपच सुंदर वाटायची आणि त्या तिला भेटल्या सुद्धा होत्या. जेव्हा मी या फोटोशूटसाठी जात होतो तेव्हा माझ्या बहिणींनी मला धमकी दिली होती, तिला पटवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तिचा नंबरही घ्यायचा नाही आणि तिला पुष्पगुच्छ सुद्धा पाठवायचे नाही. प्रियांकानं शहिद जवानांना वाहिली श्रद्धांजली, शेअर केला वडिलांचा Throwback Photo
त्यावेळी संजय दत्तच्या इमेजबद्दल सर्वांनाच माहित होतं. त्याच्या बहिणींनाही भावाचा स्वभाव माहित होता. त्यामुळे त्यांचा भाऊ ऐश्वर्याशी सुद्धा तसं वागू नये जसा तो इतर मुलींसोबत वागतो असं त्यांना वाटत होतं. संजय दत्तच्या रिलेशनशिप बद्दल त्याच्या बयोपिकमध्ये तर त्याचा हा अंदाज दाखवण्यात आलाच आहे. ऐश्वर्या आणि संजय दत्त दोन सिनेमात एकत्र दिसले. ही जोडी ‘शब्द’ आणि ‘हम किसी से कम नही’ या सिनेमात एकत्र दिसली होती. देवोलिना भट्टचार्जीविरोधात सायबर क्राइमची तक्रार दाखल, वाचा काय आहे प्रकरण
Sanjay Dutt and Aishwarya Rai look GREAT together!
— Iyan Amjad (@IyanAmjad) February 28, 2016
I want them BACK onscreen! #SarbjitPosterTomorrow pic.twitter.com/KOZNFEI4LP
सध्याचं बोलायचं झालं तर दत्त आणि बच्चन कुटुंबात खूप चांगले कौटुंबीक संबंध आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक एका मुलीचे आईवडील आहेत. तर दुसरीकडे संजय दत्तनं मान्यता दत्तशी लग्न केलं असून त्यांनाही दोन मुलं आहेत. दीपिकानं Live Chat मध्ये रणवीरला केलं ‘एक्सपोज’, पुढे काय झालं पाहा VIDEO