दीपिकानं Live Chat मध्ये सर्वांसमोर रणवीरला केलं 'एक्सपोज', पुढे काय झालं पाहा VIDEO

दीपिकानं Live Chat मध्ये सर्वांसमोर रणवीरला केलं 'एक्सपोज', पुढे काय झालं पाहा VIDEO

लाइव्ह चॅटमध्ये पहिल्यांदाच दीपिकानं रणवीरची पोलखोल केली. ज्यामुळे स्वतः रणवीर सुद्धा हैराण झालेला दिसला.

  • Share this:

मुंबई, 26 मे : दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही. आजच्या घडीला हे दोघंही बॉलिवूडमधले आघाडीचे कलाकार आहेत. एखादं अवॉर्ड फंक्शन असो किंवा मग प्रेस कॉन्फरन्स रणवीर आणि दीपिका नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण एका लाइव्ह चॅटमध्ये पहिल्यांदाच दीपिकानं रणवीरची पोलखोल केली. ज्यामुळे स्वतः रणवीर सुद्धा हैराण झालेला दिसला. एवढंच नाही तर त्यानं लाइव्ह चॅटमध्येच दीपिकाला धमकी देऊन टाकली.

फुटबॉलर सुनील छेत्रीनं त्याचा लाइव्ह चॅटशो 'इलेवन ऑन टेन'मध्ये रणवीरची मुलाखत घेतली. या चॅटशोमध्ये रणवीरनं त्याच्या खासगी जीवनातले अनेक किस्से शेअर केले. पण या चॅटच्या अगोदर दीपिकानं सुनीलला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याच्याशी संबंधीत प्रश्न ऐकल्यावर रणवीर सुद्धा आश्चर्यचकित झाला. या लाइव्ह चॅटमध्ये दीपिका बऱ्याच कमेंट करताना दिसली. तसेच लाइव्ह चॅट सुरू असताना ती मध्येच हातवारे करताना दिसली.

करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश, दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

 

View this post on Instagram

 

Part one of my chat with superstar @ranveersingh! #ElevenOnTen

A post shared by Sunil Chhetri (@chetri_sunil11) on

या लाइव्ह चॅटमध्ये सुनील छेत्रीनं रणवीरला विचारलं, मी असं ऐकलं आहे की दीपिकासोबत बॅडमिंटन खेळताना तू फक्त 3 पॉइंटच बनवू शकलास? पण त्या तीन पॉइंटसाठी सुद्धा दीपिका म्हणाली की ते तिनं तुला दिले कारण तू प्रकाश पदुकोण यांचा जावई आहेस. हे ऐकल्यावर रणवीर दीपिकावर ओरडताना दिसला. तो तिला म्हणाला, तू मला एक्सपोज करतेयस तू थांब सांगतो मी तुला नंतर. यावेळी दीपिका कॅमेरासमोर थम्सअप करताना दिसली.

 

View this post on Instagram

 

hilarious chat with #SunilChhetri #instagram #love #sunday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

सुनील छेत्री आणि रणवीर सिंह यांच्या या लाइव्ह चॅटमध्ये या गोष्टीचा सुद्धा खुलासा झाला की, लग्नाच्या अगोदर जेव्हा रणवीर दीपिकाला भेटायला जात असे प्रत्येक ठिकाणी तो तिच्यासाठी फुलं घेऊन जात असे. त्यानं आजपर्यंत दीपिकासाठी जेवण बनवलेलं नाही. या दीपिकाच्या तक्रारीवर रणवीर म्हणाला मला अंडा ब्रेड व्यतिरिक्त काहीच बनवता येत नाही. त्यावर दीपिकानं त्यांना ऑम्लेट बनवून दाखव असं म्हणत त्याची खिल्ली सुद्धा उडवली. पण चॅटच्या शेवटी तिनं रणवीर आणि सुनीलला वेल प्लेड बॉइज अशीही कमेंट केली.

71 वर्षीय लावणी सम्राज्ञी माया जाधव 15 मांजरींसह आहेत लॉकडाऊन, मदतही मिळेना

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमार करतोय जाहिरातीचं शूटिंग, सेटवरील Photo Viral

First published: May 26, 2020, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading