VIDEO : वरुण धवनचा सायकलवरून पाठलाग करत होता फोटोग्राफर, असा शिकवला धडा

VIDEO : वरुण धवनचा सायकलवरून पाठलाग करत होता फोटोग्राफर, असा शिकवला धडा

एक फोटोग्राफर वरुणला सगळीकडे फॉलो करतो. विशेष म्हणजे हा फोटोग्राफर सायकलवरुन वरुणच्या कारचा पाठलाग करत असतो.

  • Share this:

मुंबई, 11 मार्च : अभिनेता वरुण धवन ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी फोटोग्राफर्स त्याचा पाठलाग करतात. काही दिवसांपूर्वी असं करत असताना वरुण धवनची कार पायवरुन गेल्यान फोटोग्राफरला दुखापत झाली होती. पण तरीही एक फोटोग्राफर वरुणला सगळीकडे फॉलो करत असतो. विशेष म्हणजे सायकलवरुन हा फोटोग्राफर वरुणच्या कारचा पाठलाग करत असतो. अखेर यावर उपाय म्हणून वरुणनं पोलीसांना बोलावलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वरुण धवन त्याच्या कारमधून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तो पोलीसांना बोलवतो आणि एका फोटोग्राफरकडे बोट दाखवतो आणि सांगतो की हा सतत माझ्या गाडीचा पाठलाग करत असतो. त्याला प्लिज समजवा कुठे पडेल किंवा त्याला दुखापत होईल. याला तुमच्यासोबत घेऊन जा. सतत रोजवर धावत असतो.

सारा-करिनामध्ये आला आहे दुरावा? या कारणामुळे होते आहे सैफच्या कुटुंबाची चर्चा

पोलीसांना सांगितल्यावर वरुण त्या फोटोग्राफरचा हात पकडून आपल्याकडे खेचतो आणि म्हणतो, याला एक दिवस तुमच्यासोबत घेऊन जा एक दिवस जेलमध्ये राहिल्यावरच आपोआप सरळ होईल. नंतर वरुण त्याला विचारतो, वाटतेय ना आता भीती? वरुणच्या व्हिडीओवर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी वरुणचं कौतुक केलं आहे. त्याला फोटोग्राफरची वाटणारी काळजी याबद्दल काहींनी वरुणला शाबासकी दिली आहे. तर काहींनी मात्र त्यावरुनही वरुणला ट्रोल केलं आहे.

‘घरातून RSS च्या शाखेत पाठवलं जायचं पण...’ बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा

काही दिवसांपूर्वी शशांक खेतानच्या वाढदिवसच्या पार्टीला जात असताना एक फोटोग्राफर मध्ये आल्यानं वरुणच्या गाडीचं चाक फोटोग्राफरच्या पायावरुन गेलं होतं. ज्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. वरुणच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा कुली नंबर 1 चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खान स्क्रिन शएअर करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेव्हिड धवन करत आहेत.

OMG! तमन्ना भाटिया या बॉलिवूड अभिनेत्यासाठी तोडणार ऑनस्क्रिन No Kissing पॉलिसी

First published: March 11, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading