मुंबई, 11 मार्च : वयाच्या 54 व्या वर्षी आपल्या फिटनेसमुळे सर्वाधिक चर्चेत असणारा हा अभिनेता मॉडेलिंग क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. याशिवाय हा अभिनेता त्याच्या रिलेशनशिप स्टेटमुळे खूप चर्चेत असतो. हा अभिनेता आहे मिलिंद सोमण. मिलिंदनं नुकतंच ‘मेड इन इंडिया : अ मेम्योर’ हे त्याचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यानं त्याच्या आयुष्यातील अनेक माहित नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे. याशिवाय बॉलिवूड किंवा मॉडेलिंग क्षेत्रात येण्याआधी मिलिंद RSS शाखेचा सदस्य होता. हेही त्यानं या पुस्तकात सांगितलं आहे. मिलिंद सोमणनं त्याचं हे पुस्तक रुपा राय यांच्यासोबत मिळून लिहिलं आहे. या पुस्तकात त्याच्या आयुष्यातील माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना मिलिंद म्हणाला, ‘मी तरुण असताना मला माझ्या घरचे RSS च्या शाखेत पाठवत असत. माझ्या वडीलांना वाटायचं की ठिकाणी तरुण मुलांना शिस्त लागते, फिटनेस चांगला राहतो तसेच सारासार विचार करण्याची सवय लागते. आमच्या आजूबाजूचे अनेक तरुण त्यावेळी यात जोडले गेले होते. त्यामुळे माझ्या घरच्यांनीही मला तिकडे पाठवलं. पण मला तिथे जायचं नसल्यानं मी लपून राहत असे. यामुळे माझे वडील माझ्यावर रागवत.’ ‘माझं शरीर, माझी मर्जी…’ क्लिवेजवरुन ट्रोल करणाऱ्यांना रश्मी देसाईनं झापलं
मिलिंद पुढे म्हणाला, ‘जेव्हा आज मी RSS बद्दल बातम्या वाचतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं. त्यांच्याबद्दल विध्वंसक आणि सांप्रदायिक प्रपोगंडा सेट करण्याचा आरोप केला जातो. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं. कारण जेव्हा मी या शाखेत जात असे, तेव्हा आमची वेळ संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंतची होती. त्यावेळी खाकी रंगाच्या शॉर्ट पॅन्टमध्ये आम्ही मिरवणुका काढत असू, योगा करत असू, व्यायामाच्या पारंपरिक साधनांचा वापर करुन व्यायाम करत असू, त्याचवेळी गाणी गात असू संस्कृत श्लोक म्हणत असू कधी कधी त्यांचे अर्थही आम्हाला माहित नसत.’ येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे ‘अर्जुन कपूरमुळे बुडली बँक’
RSS मधील जुन्या आठवणी सांगताना मिलिंद सोमण सांगतो, ‘त्यावेळी शाखेतील मुलांना मुंबईच्या जवळपासच्या कोणत्याही हिल्स स्टेशनवर ट्रेकिंगसाठी नेत असत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम असे. हे सर्व आम्हाला देशाचा एक चांगला नागरिक म्हणून घडवणे आणि फिटनेस ठेवण्याच्या दृष्टीकोणातून शिकवलं जात आहे. मला नाही माहित RSS शी जोडले गेलेले नेता हिंदूंच्या बाबतीत काय विचार करतात मात्र त्याठिकाणी आमच्यावर मात्र कोणतेही विचार लादले जात नसत. असं असतं तर मी त्या ठिकाणी कधीच आकर्षित झालो नसतो.’ रंगोलीने चव्हाट्यावर आणली प्रायव्हेट गोष्ट, बहिणीच्या त्या ट्वीटमुळे कंगना भडकली
मिलिंद सोमण हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. याशिवाय त्यानं काही मराठी सिनेमातही काम केलं आहे. मिलिंद नेहमीच फिटनेसला प्रमोट करताना दिसतो. वयाच्या 54 व्या वर्षीही त्याचा फिटनेस हा तरुणांना लाजवेल असाच आहे. 2018 मध्ये मिलिंदनं स्वतःहून निम्म्या वयाची मॉडेल अंकिता कोनवारशी लग्न केलं होतं. त्याच्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नाच्या बेडीत अडकले होते.