मुंबई, 14 फेब्रुवारी : 27 वर्षापूर्वीचा तो काळ आठवल्यानंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री आज देखील 'हो प्रेमात मी काही गोष्टी चुकीच्या केल्या' अशी कबुली देते. त्यावेळी तिनं कुमारी माता होण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत बोल्ड पण खूप धीरानं घेतलेला असा हा निर्णय होता. मागे पाहिल्यानंतर खूप काही सोसल्याची जाणीव होते असं ही अभिनेत्री सांगते. आम्ही सांगत आहोत नीना गुप्ता यांच्या लव्ह स्टोरी बद्दल. त्यांच्या 'लव्ह स्टोरी'मध्ये देखील अनेक चढ - उतार आले.
वयाच्या 60व्या वर्षी देखील ‘बधाई हो’ सारखी जबरदस्त हिट चित्रपट दोणाऱ्या नीना गुप्ता यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली. कुमारी माता होण्याचा निर्णय घेतल्यानं समाजाच्या रोषाचा देखील सामना करावा लागला. पण, या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर 'प्रेमात मात्र त्यांची झोळी रिकामीच' राहिली.
टायगर नाही तर मग दिशा पाटनी कोणासोबत साजरा करतेय Valentine’s Day, पाहा PHOTO
दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यानंतर नीना गुप्ता सपनोंका शहर असलेल्या मुंबईंमध्ये दाखल झाल्या. यावेळी डेली सोपमध्ये काम करत असताना अलोक नाथ यांच्याशी त्याचं सूत जुळलं. पण, हे नातं काही जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर नीना गुप्ता आणि पंडित जसराज यांचा मुलगा शारंगदेव यांच्यामध्ये अफेअर असल्याचं समोर आलं. नीना या जसराज यांच्या घरी राहत होत्या. दोघांनी साखरपुडा देखील केला. पण, अचानक शारंगदेव यांनी लग्न मोडलं. नीना यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यातून बाहेर पडायला नीना गुप्ता यांना खूप काळ लागला.
व्हिव्हियन रिचर्ड आणि कुमारी माता
व्हिव्हियन रिचर्ड 70 आणि 80च्या दशकातील वेस्ट इंडिजचे गाजलेले बॅस्टमन! यावेळी भारत दौऱ्यावर असताना रिचर्ड आणि नीना गुप्ता यांची ओळख झाली. त्यावेळी रिचर्ड यांनी पत्नीशी घटस्फोट घेतला होता. दरम्यान, दोघांमध्ये दिवसेंदिवस जवळीक वाढत गेली. प्रेमात आकंठ बुडालेले दोघं भारताबाहेर देखील लंडन आणि अॅण्टीगुआ येथे भेटू लागले. शिवाय ज्यावेळी रिचर्ड मुंबईमध्ये येऊ लागले तेव्हा ते नीना यांच्या घरीच वास्तव्य करू लागले.
Bigg Boss 13 ची बक्षिसाची रक्कम वाढवली? विजेत्याला मिळणार इतके कोटी
एके दिवशी नीना गुप्ता यांनी मुंबईतील रूग्णालयामध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर नीना यांच्या कुमारी माता बनण्याची चर्चा सर्वत्र जोरात रंगली. पण, मुलीचे वडील कोण? याबद्दल मात्र त्यांनी अखेरपर्यंत मौन बाळगनं पसंत केलं. पण, काही काळानंतर नीना गुप्ता यांच्या मुलीचे वडील व्हिव्हियन रिचर्ड असल्याचं समोर आलं.
दरम्यानच्या काळात नीना गुप्ता यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. शिवाय, पैसे मिळावेत म्हणून मनाविरूद्ध काही चित्रपटांमध्ये देखील काम करावं लागलं. ज्या चित्रपटांची जादू ही बॉक्स ऑफिसवर चालली नव्हती. या दिवसांबद्दल बोलताना नीना गुप्ता आता 'मागील काही गोष्टींचा मला पश्चाताप होतो. मी वेळेत लग्न करायला हवं होतं' अशी कबुली देखील देतात.
व्हिव्हियन रिचर्ड यांनी जवळपास 25 वर्षानंतर नीना गुप्ता यांच्या मुलीचा पिता असल्याची कबुली दिली. आता रिचर्ड आपल्या मुलीशी वेळ घालवतात. तिला भेटण्यासाठी ते भारतात देखील येतात.
नव्या जीवनाची सुरूवात
आठ वर्षापूर्वी नीन गुप्ता यांनी दिल्लीतील सीए विवेक मिश्रा यांच्याशी लग्न केलं. एका विमान प्रवासादरम्यान दोघांमध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघांनी काही काळानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, विवेक गुप्ता यांचं लग्न झालेलं असल्यानं कायदेशीर अडचण होतीच. पण, पत्नीशी घटस्फोट घेत विवेक मिश्रा यांनी नीना गुप्तांशी लग्न केलं. सध्या दोघांचा संसार सुखानं सुरू आहे. नीना यांनी देखील फिल्मी दुनियेमध्ये आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे.
VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि...