मुंबई, 14 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांच्यातील केमिस्ट्री तर आता त्यांच्या सर्वच चाहत्यांना माहित आहे. या दोघांनीही त्यांच्यातील नातं सर्वांसमोर मान्य केलं नसलं तरीही त्यांच्या व्हॅलेंटाइन डेचा प्लान जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण आज दिशा टायगरसोबत नाही तर दुसऱ्याच कोणासोबत हा खास दिवस साजरा करत आहे. इतकंच नाही तर तिनं या सेलिब्रेशनचे फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफ एकीकडे त्याचा आगामी सिनेमा बागी 3च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. तर दुसरीकडे दिशा तिच्या मलंग सिनेमाचं यश साजरं करत आहे. पण या दरम्यान तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यसोबत टायगर श्रॉफ नाही तर तिचा को-स्टार आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू, अमृता खानविलकर दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना दिशानं लिहिलं, ‘माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तींसोबत’ दिशानं शेअर केलेल्या 1 तासात जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि...
दिशानं व्हॅलेंटाइन डेला ‘मलंग’ टीमसोबत फोटो शेअर केल्यानं सध्या तिचे सर्वच चाहते कमेंटमध्ये तिला टायगरबद्दल विचारताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी दिशाला विचारलं टायगर कुठे आहे. काहींनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत देशासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे याची आठवण करुन दिली. तर काही चाहत्यांनी तिला व्हॅलेंटाइन विश केलं आहे.
व्हॅलेंटाइन डेला जन्मलेली अभिनेत्री आणि गुलाब-चिठ्ठीची अधूरी कहाणी
दिशा पाटनीचा मलंग सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या सिनेमाला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मोहित सुरीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अमृता खानविलकर, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर दुसरीकडे टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ज्याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो