मुंबई,7 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रिकेटर ऋषभ पंतसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत होती. आता ती पाकिस्तान क्रिकेटर नसीम शाहसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या दुबईत सुरू असलेल्या आशिया कपच्या क्रिकेट सामन्यांमध्ये उर्वशी स्टेडियममध्ये उपस्थित असलेली दिसून येत आहे. आतापर्यंत उर्वशीचे नाव भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडले जात होते. पण आता उर्वशीने पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील सोशल मीडियावरील वादाच्या बातम्या सतत येत असतात. पण आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक रील शेअर केली आहे. पण या रीलमध्ये ऋषभ नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून उर्वशी प्रचंड ट्रोल होत आहे. या अभिनेत्रीला आता पाकिस्तानातूनही खूप कमेंट्स मिळत आहेत. उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती क्रिकेट मॅच पाहताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह उर्वशीला पडद्यावर पाहून स्माईल देताना दिसत आहे. तर उर्वशीही पाहून स्माईल देताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून उर्वशीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. उर्वशीने आता तिच्या इन्स्टाग्रामवरून ही स्टोरी हटवली आहे. परंतु आता काही फॅनपेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अशा परिस्थितीत लोक पुन्हा उर्वशीला या व्हिडिओसाठी प्रचंड ट्रोल करत आहेत.
**(हे वाचा:**
विराट कोहली नव्हे तर ‘या’ खास व्यक्तींसोबत अनुष्काची ब्रेकफास्ट डेट; समोर आले फोटो
) इतकंच नव्हे तर आता सोशल मीडियावर उर्वशी आणि नसीम शाह यांच्याबाबत मिम्सचा पाऊस पडत आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून अनेक मजेशीर मिम्स बनवण्यात आले आहेत.
सध्या उर्वशी रौतेला आणि नसीम शाह प्रचंड चर्चेत आले आहेत. अनेकांनी या दोघांसोबत क्रिकेटर ऋषभ पंतलादेखील या मिम्समध्ये समाविष्ट केलं आहे.