मुंबई, 13 फेब्रुवारी : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. उर्वशी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं विराट कोहलीला टक्कर देणारा व्हिडीओ शेअर करुन चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये उर्वशी 120 किलोंचं वजन उचलून वर्कआउट करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे. जवळपास 24 लाखांपेक्षा जास्त लोकांनी उर्वशीचा हा व्हिडीओ पाहिला आहे. उर्वशी तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. हे तिच्या या व्हिडीओवरुन दिसून येतं. मालदीव्सच्या किनाऱ्यावर मौनी रॉयचा बोल्ड अंदाज, शेअर केले TOPLESS फोटो
काही दिवसांपूर्वी उर्वशीनं विराट कोहलीप्रमाणं वर्कआउट करताना हा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ उर्वशीनं तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओतून उर्वशीनं तिच्या चाहत्यांना फिटनेस टीप्स दिल्या आहेत. विराट आणि उर्वशी या दोघांच्याही व्हिडीओमध्ये ते दोघंही उंच उडी मारताना दिसत आहेत. पण या दोघांनी केलेला हा एक्सरसाइझ म्हणावा तेवढा सोप्पा नक्कीच नाही. यासाठी या दोघांनीही खूप मेहनत घेतली आहे. उर्वशीच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनन्या पांडे की सारा अली खान? कोणाला डेट करतोय कार्तिक आर्यन
उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच तिचं गाणं ‘एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणं रिलीज झालं. सोशल मीडियावर हे गाण खूपच पसंत केलं गेलं. याआधी उर्वशी पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ, कृति खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 2014 मध्ये आलेलं हनी सिंहचं गाणं लव्ह डोसमुळे उर्वशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कमाई करत असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं होतं. ती तिच्या एका पोस्टसाठी लाखो रुपये आकारते. VIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा