मुंबई, 13 फेब्रुवारी : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सध्या त्याच्या सिनेमापेक्षा अफेअर्समुळे चर्चेत आहे. याची सुरुवात झाली होती ते सारा अली खाननं करण जोहरच्या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे. या शोमध्ये तिनं कार्तिकला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर करिना कपूरच्या रेडिओ शोमध्ये तर कार्तिकनं खुलेआम हे प्रपोजल एक्सेप्ट करत करिनाला सैफ अली खानकडे साराचा हात मागू का असं विचारलं होतं. एकीकडे सारा आणि कार्तिक यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे त्याचा मागचा सिनेमा पती पत्नी और वो मधील अभिनेत्री अनन्या पांडेशी त्याचं नाव जोडलं जाऊ लागलं. या दोघांना जेव्हा याबद्दल विचारलं गेलं तेव्हा या दोघांनीही ही गोष्ट हसत हसत टाळली. कार्तिकच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक आणि अनन्याची केमिस्ट्री खूप चांगली आहे. पण यामुळे चाहत्यांचा मात्र गोंधळ उडाला की कार्तिक सारा आणि अनन्यापैकी नक्की कोणाला डेट करत आहे. मात्र आता कार्तिकनं तो कोणाला डेट करतो याचा खुलासा स्वतःच केला आहे. लग्न झालेलं असूनही बॉलिवूडचा प्रसिद्ध गीतकार पडला होता पुन्हा प्रेमात!
लव्ह आजकल सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कार्तिकनं न्यूज 18 हिंदीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं. कार्तिक म्हणाला, जेव्हा कॉफी विथ करणमध्ये सारानं मला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी यावर काहीच रिअॅक्ट करु शकलो नव्हतो. कारण मी त्यावेळी काहीही प्रतिक्रिया दिली असती तरी मीडियामध्ये त्याची चर्चा झाली असतीच. त्यामुळे साराबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापासून दूर राहत असे. 23 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह
कार्तिक पुढे म्हणाला, सारा व्यतिरिक्त माझं नाव बऱ्याच मुलींशी जोडलं गेलं. पण यातील कोणालाही मी डेट करत नाही. मस्करीमध्ये माझं नाव कोणाशीही जोडलं जातं. पण माझं कोणाशीच अफेअर नाही. मी अभिनेता आहे आणि माझ्या कामानिमित्त मी प्रोड्यूसर डायरेक्टर आणि अभिनेता सर्वांना भेटतो. पण जेव्हा मी एखाद्या अभिनेत्रीला भेटतो तेव्हा मात्र तिच्याशी माझं नाव जोडलं जातं. मात्र यातील एकही गोष्ट खरी नाही. VIDEO : प्रमोशन दरम्यान कार्तिकनं असं काय केलं की, सर्वांसमोर भडकली सारा