खरं तर एका डान्स शो दरम्यान कार्तिकच्या हाताला दुखापत झालेली आहे. त्यामुळे सारानं काळाजीपोटी त्याला असं करण्यास मनाई केली मात्र तरीही कार्तिक अरे प्रमोशनसाठी आलो आहोत असं म्हणाला. त्यामुळे कार्तिक आपलं ऐकत नाही हे पाहिल्यावर साराला राग आला आणि तिनं सर्वांसमोर त्याला तुझी मर्जी जे करायचं ते कर असं म्हटलं. एवढं झाल्यावरही कार्तिकनं तिचं ऐकलं नाही आणि त्यानं बसवरून उडी मारलीच ही गोष्ट साराला अजिबात आवाडली नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे. VIDEO : नेहा-आदित्यची रोमँटीक केमिस्ट्री, ‘Goa Beach’चा सोशल मीडियावर धुमाकूळView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kartik aryan, Sara ali khan