• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘तनहा तनहा’ गाण्यावेळी उर्मिलाने 'या' अभिनेत्याचे घातले होते बनियन; स्वतःच केला खुलासा

‘तनहा तनहा’ गाण्यावेळी उर्मिलाने 'या' अभिनेत्याचे घातले होते बनियन; स्वतःच केला खुलासा

‘तनहा तनहा’ गाण्यावेळी उर्मिलाने 'या' अभिनेत्याचे घातले होते बनियन

‘तनहा तनहा’ गाण्यावेळी उर्मिलाने 'या' अभिनेत्याचे घातले होते बनियन

उर्मिलाने 26 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला' (Rangeela)चित्रपटातील ‘तनहा तनहा’ गाण्याबद्दलची एक खास गोष्ट शेअर केली आहे. सध्या हा किस्सा चांगलाच व्हायरल होतं आहे. ‘तनहा तनहा’ गाण्यात उर्मिलाचा बोल्ड लूक पाहायला मिळला होता..

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar Bollywood Movie) बॉलिवूडला टाटा बाय बाय केले असले तरी, ती तिच्या चित्रपटांतील भन्नाट किश्श्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्मिलाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, उर्मिलाने 26 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला' (Urmila Matondkar Rangeela) चित्रपटातील ‘तनहा तनहा’ गाण्याबद्दलची एक खास गोष्ट शेअर केली आहे. सध्या हा किस्सा चांगलाच व्हायरल होतं आहे. नुकतीच उर्मिलाने ‘झी कॉमेडी शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. उर्मिलाच्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘रंगीला’. या चित्रपटातील ‘तनहा तनहा’ गाण्यात उर्मिलाचा बोल्ड लूक पाहायला मिळला. या गाण्यात उर्मिला समुद्रावर डान्स करताना दिसतेय. या गाण्यात एके ठिकाणी तिने पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. मात्र प्रत्यक्षात हा ड्रेस नसून उर्मिलाने या गाण्यावेळी बनियन परिधान (Urmila Matondkar wore Jackie Shroff vest) केली होता. हे वाचा- Bigg Boss Marathi फेम सई लोकूरची मालदीवमध्ये रोमँटिक डेट; पतीसोबत फोटो केले शेअर तर हा बनियन कुणाचा, उर्मिलाने केला खुलासा ‘तनहा तनहा’या गाण्यावेळी उर्मिलाने जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) पांढरी बनियान परिधान केली होती. “कुणाला माहित नाही मात्र रंगीला सिनेमातील ‘तनहा तनहा’ गाण्यासाठी मी जॅकी श्रॉफची गंजी घातली होती आणि हे खूपच मजेशीर होते. फोटो: YouTube आम्हाला सांगितले होते काही तरी नॅचरल वाटेल असा विचार करा. जेव्हा आम्ही कपड्यांबद्दल चर्चा करत होतो तेव्हा जॅकी मला म्हणाला की तू माझी बनियान घाल. कसं दिसेल मला खात्री नव्हती. मी सर्व देवावर सोडलं. मात्र यासाठी माझं नंतर कौतुक झालं.” असा भन्नाट किस्सा उर्मिलाने शेअर केला आहे. हे वाचा- VIDEO: गार्डसोबतच्या या वर्तवणुकीमुळे Kareena Kapoor झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी.... ''भिडू ये पहन लो'' सुरुवातील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या गाण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कपड्यांना नकार दिला होता. त्यांनी जॅकी श्रॉफच्या टीशर्टकडे बोट दाखवत उर्मिलासाठी असं काही तरी हवं असल्याची कल्पना मांडली होती. यावर जॅकीने त्याचं बनियान काढलं आणि तो म्हणाला, “भिडू ये पहन लो”. ‘रंगीला’ सिनेमात उर्मिलासोबत आमिर खान आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमामुळे उर्मिलाला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
  Published by:Dhanshri Otari
  First published: