मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: गार्डसोबतच्या या वर्तवणुकीमुळे Kareena Kapoor झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी म्हटलं, 'घमेंडी' आणि 'ऍटिट्यूडवाली आंटी'

VIDEO: गार्डसोबतच्या या वर्तवणुकीमुळे Kareena Kapoor झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी म्हटलं, 'घमेंडी' आणि 'ऍटिट्यूडवाली आंटी'

अभिनेत्री करिना कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्स मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्री करिना कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्स मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्री करिना कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्स मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2ऑक्टोबर- बॉलिवूडची (Bollywood) 'बेबो गर्ल' अर्थातच अभिनेत्री करिना कपूर(Kareena Kapoor) सध्या चित्रपटांसोबत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते. तर कधी तिच्या फॅन्स पेजवर तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमधील वागणुकीमुळे करीना कपूर बऱ्याचवेळा ट्रोलदेखील (Troll) होत असते.बेबोसोबत पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. करिनाच्या एका फॅन पेजने तिच्या एक व्हडिओ शेअर केला आहे. मात्र त्यातील वर्तवणुकीमुळे करिना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करिना कपूर आपल्या घरातून निघून कारमध्ये येऊन बसताना दिसून येत आहे. यावेळी करिनाच्या हातात एक कॉफीचा मग आहे. तर करिनाने स्किन कलरची शॉर्ट्स आणि फुल डेनिम शर्ट घातला आहे. तसेच डोळ्यावर गॉगलदेखील चढवले आहे. करिना एकदम कूल अंदाजात चालून येत आहे. मात्र घरापासून कारमध्ये येऊन बसण्याच्या दरम्यान असं काही घडलं की ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

(हे वाचा:फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या साडीत खुललं Malaika Aroraचं सौंदर्य; साडीची किंमत ऐकून...)

तर करिना कपूर कारकडे जात असताना, तिच्या घरातील एक गार्ड तेथे उभा असतो. हा एक वयस्कर व्यक्ती आहे. करिना आपल्या जवळ येताच हा गार्ड तिला आदराने सॅल्यूट करतो. मात्र करिनाचं तिच्याकडे लक्षचं नसतं. या वागणुकीमुळे नेटकरी तिच्यावर भडकले. आणि तिला मोठ्या कठोर शब्दात ट्रोल करू लागले आहेत. युजर्सना करिनाची ही वर्तवणूक अजिबात रुचलेली नाही म्हणूनच ती पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

ट्रोलर्सने केलं ट्रोल-

अभिनेत्री करिना कपूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्स मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत करिनाला 'घमेंडी' म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे, 'करिनाला इतका कोणत्या गोष्टीचा घमेंड आहे. गार्डने तिला सॅल्यूट केलं मात्र तिने ते इग्नोर केलं', तर आणखी एकाने म्हटलं आहे, 'मनी ऍटिट्यूडवाली आंटी'. तसेच इतर युजर्सही करिनाला घमेंडी म्हणत तिच्यावर टीका करत आहेत. करिना कपूर ट्रोल होणं हे काही पहिल्यांदा नाहीय या आधीही करिना आपल्या वर्तवणुकीवरून ट्रोल झाली आहे.

First published:

Tags: Entertainment, Kareena Kapoor