जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed : सोशल मीडिया गाजवल्यानंतर उर्फीची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' चित्रपटात दिसण्याची शक्यता

Urfi Javed : सोशल मीडिया गाजवल्यानंतर उर्फीची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' चित्रपटात दिसण्याची शक्यता

उर्फी जावेद

उर्फी जावेद

आपल्या फॅशनने लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या उर्फीनं बॉलिवूड सेलिब्रिटी ते मोठमोठे फॅशन डिझायनर यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता उर्फी बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : ‘बिग बॉस ओटीटी’मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या उर्फी जावेदने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. आपल्या अतरंगी फॅशनमुळं उर्फी चर्चेत असते. कधी उर्फीचा फॅशन सेन्स लोकांना आवडतो, तर कधी ती ट्रोलच्या निशाण्यावर येते पण त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात ती मागे राहिली नाही. सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त शैलीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तिच्या वक्तव्यांमुळे ती वादात देखील सापडते. आपल्या फॅशनने लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या उर्फीनं बॉलिवूड सेलिब्रिटी ते मोठमोठे फॅशन डिझायनर यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता उर्फी बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच एकता कपूरनं तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. ‘एलएसडी 2’ असं या चित्रपटाचं नाव होतं. आता उर्फीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तिला एलएसडी २ या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फी व्यतिरिक्त या चित्रपटात ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया देखील दिसणार आहे. एकता टास्क घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली तेव्हा शोदरम्यानच निमृतला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटासाठी चित्रपट निर्मात्यांनी उर्फीशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या अभिनेत्रीने या प्रतिक्रियेत काय म्हटले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धर्मेंद्रना कधीच पाहायचा नव्हता हेमा मालिनी अन् बिग बींचा ‘बागबान’? अभिनेत्रीने अखेर सांगूनच टाकलं एकता कपूरचा ‘एलएसडी’ 2 हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘एलएसडी’चा सिक्वेल आहे. ज्यामध्ये राजकुमार राव, नुसरत भरूचा आणि अंशुमन झा सारखे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट तर हिट ठरलाच पण त्याच्या चित्रपट निर्मातीचेही खूप कौतुक झाले. त्यामुळे आता याचा पुढचा भाग पाहण्याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता उर्फी या चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळकणार, तिचा लूक कसा असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

जाहिरात

दरम्यान, उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने शूजपासून  ड्रेस बनवला आहे.  या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद बॉक्समधून शूज काढते आणि आकार बरोबर नसल्यामुळे अस्वस्थ होते, परंतु तिला लगेच नवीन कल्पना सुचते आणि ती शूजपासून  ड्रेस बनवते. उर्फीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात