मुंबई, 16 डिसेंबर- बिग बॉस फेम उर्फी जावेद (urfi javed ) तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत असते. उर्फी काहीही परिधान करते मग ती चाहत्यांचे लक्ष्य बनते. बिग बॉसनंतर उर्फीने आतापर्यंत सतत तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. आता देखील तिनं असाच काही ड्रेस घातला आहे. ज्यामुळं उर्फी नेहमीप्रमाने ट्रोवर्सच्या निशाण्यावर आली आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी पहिल्यांदाच तिच्या डेनिम टॉपसाठी ट्रोल झाली. तेव्हापासून आजपर्यंत कपड्यावरून ट्रोल होण्याचा सिलसिला सुरूच आहे. उर्फी नेहमीच नवीन काहीतरी ट्राय करत असते. त्यामुळं ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होते. आता चाहत्यांना देखील उर्फीच्या नवीन कपड्याची उत्सुकता असते. अलीकडेच उर्फीने निळ्या रंगाचा ब्रा टॉप घातला होता. आणि त्यावर तिनं पांढरी जाळी घातली होती. त्याला पाहताच ती पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. वाचा: प्रार्थना बेहेरेने श्रेयश तळपदेच्या सीक्रेटची कशी केली पोल, पाहा.. ट्रोलर्संकडून कमेंटचा धुळा…. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या उर्फीने काल तिच्या इन्स्टावर निळ्या रंगाच्या ब्रा टॉपमध्ये फोटो शेअर केले होते. तिनं त्यावर पांढऱ्या रंगाची जाळी देखील घातली होती. ज्याबद्दल चाहते म्हणू लागले की, आता उर्फीने देखील मच्छरदाणी घातली आहे. प्रत्येक वेळी उर्फीला तिच्या कपड्यांबद्दल विचित्र कमेंट्स ऐकाव्या लागतात. उर्फीच्या या ड्रेसवर ट्रोलर्सही कमेंट करत आहेत, एका यूजरने लिहिले की, आज मासेमारीच्या जाळ्यात कबुतर अडकले, अशा अनेक कमेंट्स उर्फीच्या फोटोवर केल्या जात आहेत. वाचा: राखीने-शमिताला चक्क ‘ब्रा’मध्ये वस्तू लपवण्याचा दिला सल्ला, मग झालं असं… उर्फी फिटनेसकडे देते खूप लक्ष उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. ‘डेढ़ी-मेढ़ी फैमली’ या टीव्ही शोमधून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
उर्फी जावेद मुळची युपीची.. उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने ‘चंद्र नंदनी’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जिजी माँ’, ‘दयान’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, यामध्ये काम केले आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली व चर्चेत देखील आली. urfi javed again trolled- after-wearing-blue-top-with-white-net

)







