मुंबई, 16 डिसेंबर- बिग बॉस 15 (Bigg Boss 15) हा शो सध्या एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. शोमध्ये अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्यासाठी खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाला कार्य जिंकायचे आहे. कुटुंबातील सदस्यांना नवीन काम देण्यात आले आहे. जिथे त्यांना म्युझियममधून वस्तू चोरायच्या आहेत. या टास्कदरम्यान राखीने शमिता शेट्टीला दिलेल्या सल्ल्याची खूप चर्चा होत आहे. राखीने शमिताला दिला असा काही सल्ला… काही खेळाडू टास्कमध्ये चोर झाले आहेत. त्यांना म्युझियममधून वस्तू चोरायच्या आहेत. शमिता शेट्टीही (Shamita Shetty) चोर झाली आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) या टास्कची डायरेक्टर आहे. टास्क सुरू करण्यापूर्वी राखी शमिता शेट्टीशी बोलते आणि म्हणते, स्पर्धक भांडण्यात व्यस्त असतील. मी त्यांचे लक्ष विचलित करीन आणि त्यांना व्यस्त ठेवीन. सर्व व्सतू तू चोर आणि सर्व आपल्या ब्रामध्ये लपवून ठेव. राखीचे बोलणे ऐकून शमिता शेट्टीला आश्चर्य वाटते. शमिताला वाटते, ब्राच्या आत सर्व गोष्टी कशा काय लपवू शकतो. वाचा : 15 व्या वर्षीच कतरिनाच्या प्रेमात पडला होता विकी! पाहा थ्रोबॅक फोटो? यावर प्रतिक्रिया देताना राखी सावंत म्हणाली, देवाने आपल्याला काहीही दिले नरी आपल्याला तिजोरी दिली आहे. यावर शमिता शेट्टी राखीला आय लव्ह यू राखी म्हणते. राखी सावंतने सीजन 14 मध्ये मनोरंजनाने धमाल उडवून दिली होती. तिने या शोमध्ये टॉप 5 मध्ये आपले स्थान निर्माण केले. राखीची जादू सीजन 15 मध्येही कायम आहे. राखी फिनालेचे तिकीट मिळवणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.
सीजन 15 मध्ये राखी सावंतने पती रितेशसोबत एंट्री केली आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर राखीच्या पती जगासमोर आला आहे. या शोमधील राखी आणि रितेशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. मात्र, रितेशचे राखीसोबतचे असभ्य वर्तन लोकांना आवडत नाही. गेल्या वीकेंडच्या वॉरमध्ये फराह खान शोमध्ये आली होती आणि तिने रितेशला राखीशी वाईट बोलू नको, अशी सूचना केली होती. रितेशला लवकरच शोमधून बाहेर काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

)







