मुंबई, 16 एप्रिल : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हटक्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे सगळ्यांचंच लक्ष वेधते. तिचे अतरंगी लूक नेहमीच व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसते. आपल्या या ग्लॅमरस लूकमुळे उर्फी सतत वादातसुद्धा सापडत असते. तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलदेखील केलं जातं. पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी नेहमीच काहीतरी नवनवीन करत चर्चेत येत असते. तिच्या याच वागण्यामुळे तिचा जीव देखील धोक्यात आला आहे. आता पुन्हा तिच्यासोबत असंच काहीसं घडलं आहे. सध्या उर्फी जावेद एका मोठ्या कारणाने चर्चेत आहे. उर्फी जावेदने सोशल मीडियावर खुलासा केला आहे की, तिला अज्ञात कॉलरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे आता उर्फी जावेदने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रविवारी उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. उर्फीच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील आहे.
या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद स्वतःला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा करताना दिसत आहे. ती म्हणाली ‘माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी एक दिवस धमक्या मिळाल्या आहेत. आजारपणातही मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली आहे. त्याच्याकडे माझ्या गाडीचा नंबर आहे आणि ती व्यक्ती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे.’ धर्म बदलून केलं लग्न; घटस्फोटानंतर ‘या’ अभिनेत्रीनं नवऱ्यालाच दिली पोटगी; कारण वाचून म्हणाल… इन्स्टा स्टोरीमध्ये उर्फी जावेदने पुढे लिहिले आहे की, ‘तर नीरज पांडेच्या ऑफिसमधून मला कोणीतरी फोन केला की तो त्यांचा असिस्टंट आहे आणि सर मला भेटायचे आहेत. म्हणूनच मी म्हणाले की मीटिंगपूर्वी प्रोजेक्ट्सची सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यावर कथित सहाय्यक खरोखरच संतापला आणि म्हणाला नीरज पांडेचा अपमान करण्याची माझी हिम्मत कशी झाली? त्याने मला सांगितले आहे की त्याला माझ्या कारचा नंबर आणि सर्व काही माहित आहे आणि मी ज्या प्रकारचे कपडे घालते त्यामुळे मला मारले जावे. मी तपशीलाशिवाय मीटिंगला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने त्यांनी हे सर्व सांगितले.’
आता उर्फीने या प्रकरणाविषयी पोलिसात तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेतं ते पाहणं महत्वाचं आहे. उर्फी तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती अलीकडेच एका साऊथ मॅगझिनच्या डिजिटल कव्हरवर डिझायनर कपड्यांमध्ये दिसली होती. ती प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनची मॉडेल देखील बनली.