अभिनेत्री पूजा बेदीने अभिनयासोबतच पुस्तके लिहिण्याचे आणि अनेक मोठे शो होस्ट करण्याचे कामही केले आहे. ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांच्या घरात जन्मलेल्या पूजा बेदीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान निर्माण केले.
पूजा बेदीने 1994 मध्ये पारसी मुस्लिम आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट फरहान इब्राहिमशी लग्न केले. पूजा बेदीनेही लग्नाआधी धर्म बदलला होता.
पूजाने धर्म बदलून स्वतःचे नाव नूरजहाँ ठेवले. लग्नाच्या 3 वर्षांनी पूजा बेदीची मुलगी आलियाचा जन्म 1997 मध्ये झाला. यानंतर 2000 मध्ये उमर या मुलाचा जन्म झाला.
मुले झाल्यानंतर पूजा बेदीचं संसाराला तडा गेला आणि 2003 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी घटस्फोट घेतला.
पूजाचा नवरा करोडपती होता पण घटस्फोटानंतर तिने त्याच्याकडून पोटगी घेतली नाही. उलट मुलांची जबाबदारी देखील स्वतःवर घेतली.
पूजा बेदीने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि, घटस्फोटानंतर काही दिवसातच माजी पतीचा तिला फोन आला, त्याला काही पैशांची आवश्यकता होती.
त्यानंतर पूजाने त्याला स्वतःच्या कमाईतील पैसे कर्ज म्हणून दिले इतकंच नाही तर त्यावर व्याज देखील घेतलं.