जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 13 लहानग्या स्पर्धकानं केली बिग बींची बोलती बंद! त्यानंतर काय झालं?

KBC 13 लहानग्या स्पर्धकानं केली बिग बींची बोलती बंद! त्यानंतर काय झालं?

KBC 13 लहानग्या स्पर्धकानं केली बिग बींची बोलती बंद! त्यानंतर काय झालं?

KBC 13 मध्ये एका स्पर्धकानं अमिताभ यांचा इंटरव्ह्यू (Amitabh Interview) घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती त्यांनी लगेच मान्यदेखील केली; मात्र त्या लहानग्या स्पर्धकाने बिग बींना असा काही प्रश्न विचारला, की त्यांची बोलतीच बंद झाली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 20 नोव्हेंबर : सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 13) या शोचा तेरावा सीझन सुरू आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा शो होस्ट करतात. शो होस्ट करत असताना अमिताभ स्पर्धकांसोबत विविध विषयांवर चर्चा करताना दिसतात. अनेकदा बिग बींना स्पर्धकांची चेष्टा करण्याची लहरदेखील येते. त्यांनी आतापर्यंत केबीसीच्या सेटवर सर्वसामान्य स्पर्धकांबरोबरच सेलिब्रेटी गेस्टचीसुद्धा अनेकदा मस्करी केली आहे. मात्र आपली ही चेष्टा-मस्करीची आणि मोकळेपणानं गप्पा मारण्याची सवय बिग बींच्या अंगलट आली आहे. एका स्पर्धकानं अमिताभ यांचा इंटरव्ह्यू (Amitabh Interview) घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती त्यांनी लगेच मान्यदेखील केली; मात्र त्या लहानग्या स्पर्धकाने बिग बींना असा काही प्रश्न विचारला, की त्यांची बोलतीच बंद झाली. नंतर, त्यांनी त्या स्पर्धकाला निघून जाण्यासदेखील सांगितलं. ‘ दैनिक जागरण ‘ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये सध्या ‘स्टुडंट्स स्पेशल वीक’ (Students Special Week) एपिसोड सुरू आहेत. अशाच एका स्पेशल एपिसोडमध्ये आराधी गुप्ता नावाची स्पर्धक सहभागी झाली होती. आराधी प्रचंड बोलकी होती. आराधीनं शोदरम्यान अमिताभ बच्चन यांना सांगितलं, की तिला मोठी झाल्यानंतर पत्रकार व्हायचं आहे. सोबतच तिनं बिग बींची (Big B) मुलाखत घेण्याची इच्छाही व्यक्त केली. सेटवर आलेल्या लहानग्या पाहुणीचं मन मोडण्याची बिग बींची इच्छा नव्हती. त्यांनी तत्काळ तिला मुलाखत घेण्याची परवानगी दिली. Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग ट्विस्ट; ‘या’ स्पर्धकांची घरात पुन्हा होणार एन्ट्री! खुद्द अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांचीच मुलाखत घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आराधीनं संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तिनं बिग बींवर एकापाठोपाठ एक अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. आराधीनं विचारलेल्या एका प्रश्नावर मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ‘तुमचा आवाज अॅलेक्सासाठी रेकॉर्ड झाला आहे. तुमच्या घरी जया आंटी जेव्हा ‘अॅलेक्सा एसी चालू कर’ म्हणतात तेव्हा अॅलेक्सा उत्तर देते की तुम्ही?’ असा प्रश्न आराधीनं बिग बींना विचारला. आराधीनं हा प्रश्न विचारल्यानंतर बिगं बी एकदम शांत बसले. सेटवर धीरगंभीर वातावरण निर्माण झालं. अमिताभ काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. सेटवरचं वातावरण गंभीर केल्यानंतर त्यांनी आराधीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही जर्नालिस्ट, मला पुढे मुलाखत देण्याची इच्छा नाही. कृपया तुम्ही माझं घर सोडून परत जा. तुम्ही विचित्र प्रश्न विचारत आहात,’ असं उत्तर त्यांनी आराधीला दिलं. ‘आम्ही घरी अॅलेक्सा मॅन्युअली वापरतो. त्यामुळे घरात असं काही घडण्याची शक्यता नाही,’ असंदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत. अनुष्का रंजनच्या मेहंदीत आलिया भट्टचा No Makeup लुक; फोटो पाहून चाहत्यांनी केली वाह-वाह खेळादरम्यान, बिग बी स्पर्धकांना कॉम्प्युटरवर निश्चित केलेल्या प्रश्नांशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच प्रश्न विचारतात. बिग बींच्या या स्वभावामुळे प्रत्येक जण त्यांच्याशी अगदी मोकळेपणानं बोलतो. ‘स्टुडंट्स स्पेशल वीक’दरम्यान देशातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या शाळकरी मुलांनी होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. या मुलांसोबत बिग बींनी लहान होत मस्तीदेखील केली. Keywords: Kaun Banega Crorepati 13, Amitabh Bachchan, Amitabh Interview. Link: https://www.jagran.com/entertainment/tv-kaun-banega-crorepati-13-contestant-aradhi-gupta-asked-questions-to-amitabh-bachchan-about-jaya-bachchan-big-b-say-to-leave-the-show-22223098.html वृषाली

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात