• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग ट्विस्ट; 'या' स्पर्धकांची घरात पुन्हा होणार एन्ट्री!

Bigg Boss 15: बिग बॉसमध्ये बिग ट्विस्ट; 'या' स्पर्धकांची घरात पुन्हा होणार एन्ट्री!

'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) हे दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. या प्रसिद्ध टीव्ही शोसोबत जवळपास प्रत्येक स्पर्धकाशी प्रेक्षकांचं खास नातं बनलं आहे. आता शोला अधिक रंजक बनवण्यासाठी वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) होणार आहे. एक-दोन नव्हे तर अनेक स्पर्धक घरात येणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- 'बिग बॉस १५'  (Bigg Boss 15)  हे दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. या प्रसिद्ध टीव्ही शोसोबत जवळपास प्रत्येक स्पर्धकाशी प्रेक्षकांचं खास नातं बनलं आहे. आता शोला अधिक रंजक बनवण्यासाठी वाईल्ड कार्ड एन्ट्री   (Wild Card Entry)  होणार आहे. एक-दोन नव्हे तर अनेक स्पर्धक घरात येणार आहेत. डोनल बिष्ट, विधी पांड्या व्यतिरिक्त बिग बॉस ओटीटीचा भाग असलेले जिशान खान आणि अक्षरा सिंह देखील घरात प्रवेश करणार असल्याची बातमी आहे. याशिवाय बेघर झालेल्या एका अशा स्पर्धकाचे नावही पुढे येत आहे.जिने सुरुवातीच्या टप्प्यातच घरात प्रचंड गोंधळ घातला आणि याच कारणासाठी ती घराबाहेरही पडली.
  सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 'बिग बॉस 15' मध्ये खळबळ माजवणारी गायिका अफसाना खानची पुन्हा एंट्री होऊ शकते. काही दिवसांपूर्वी बिग बॉसने अफसानाला शिक्षा म्हणून बेघर केले होते. अशा परिस्थितीत अनेक वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये या गायकाचेही नाव असल्याची बातमी येत आहे. अफसानाच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट्सही याच दिशेने निर्देश करत आहेत. तथापि, अशी कोणतीही अधिकृत माहिती स्पर्धक किंवा शो निर्मात्यांकडून बाहेर आलेली नाही. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून अफसाना खानने चाहत्यांना विचारले आहे की त्यांना कोण मिस करत आहे. इतकंच नाही तर अफसानाने 'आम्ही नाही तर मजा संपली' असं लिहिलं आहे. अफसानाच्या या पोस्टवर चाहतेही तिखट कमेंट करत आहेत आणि तिला शोमध्ये परतण्याची मागणी करत आहेत. एकाने लिहिले, 'कृपया अफसाना मॅडम BB15 वर परत या.. मी सहमत आहे की तुम्ही चुकीचे केले आहे. तुम्ही स्वतःला दुखावले होते पण काहीही झाले तरी मी तुम्हाला समर्थन देतो आणि मला माहित आहे कि ते सर्व रागाच्या भरात झालं होतं. परंतु मला माहित आहे की तुम्ही मनाने खूप चांगले आहात'. तुम्हाला सांगू इच्छितो की, अफसाना खान एका टास्कदरम्यान इतकी हिंसक झाली की तिने स्वतःला इजा करण्यासाठी चाकू उचलला होता. मात्र, घरात उपस्थित असलेल्या जय भानुशाली आणि करण कुंद्रा यांनी तिला अडवले. मात्र अफसानाचे हे हिंसक वागणे पाहून बिग बॉसने तिला घराबाहेर काढले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: