मुंबई, 20 नोव्हेंबर- राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) यांच्या लग्नानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापाठोपाठ एक बँड-बाजा-बारात पाहायला मिळत आहेत. आता आलिया भट्टची (Alia Bhatt) BFF अभिनेत्री अनुष्का रंजन (Anushka Ranjan) तिच्या प्रेमाला एक नवीन नाव देणार आहे. अनुष्का तिचा प्रियकर आदित्य सीलसोबत लग्न करत आहे. उद्या म्हणजेच 21 नोव्हेंबरला दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी घरात होणारे सर्व विधी अनुष्काच्या घरी होत आहेत.नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्यामध्ये आलिया भट्ट, वाणी कपूरसोबत टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा क्रिस्टल डिसूझाही पोहोचली होती.
अनुष्का रंजनच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंनंतर आता तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. या सोहळ्यादरम्यान अनुष्काची बहीण आकांक्षा रंजनची BFF (बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर) अभिनेत्री आलिया भट्टही पोहोचली होती. यादरम्यान ती नो मेकअप लूकमध्ये दिसली. यावेळी आलिया भट्टने लाल रंगाचा एथनिक आउटफिट कॅरी केला होता. आलियाचा हा साधा अवतार लोकांना आवडला आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया तिची मैत्रिण आकांक्षा रंजनसोबत दिसत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. आलियाचा सिंपल लूक लोकांना आवडत आहे. लोक कमेंट करून तिला सिंड्रेला म्हणत आहेत. आणखी एका यूजरने लिहिले की, आलिया खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी, ‘चंदीगढ करे आशिकी’ रिलीज होण्यापूर्वी वाणी कपूरने तिची मैत्रिण अनुष्काच्या मेहंदीमध्ये धम्माल केली आहे. तिने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या मिलियन डॉलर्स स्माईलने सर्वांनाच घायाळ केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. (हे वाचा:
VIDEO: कार्तिक आर्यननं लाजत सांगितलं आपलं रिलेशनशिप स्टेट्स; ऐकताच कपिल शर्माला
) कोण आहे आदित्य सील- आदित्य सीलने ‘पुरानी जीन्स’, ‘तुम बिन 2’, ‘नमस्ते इंग्लंड’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ आणि ‘इंदू की जवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदित्य सील आणि अनुष्का रंजन साडेतीन वर्षांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात भेटले होते. यादरम्यान दोघांमध्ये खूप संवाद झाला. कार्यक्रमानंतरही ते एकमेकांना भेटले आणि त्यानंतर दोघेही प्रेमात पडले.