सोनी मराठीवर 'अजूनही बरसात आहे' ही मालिका आपलं मनोरंजन करत आहे. जुलैमध्ये सुरु झालेल्या या मालिकेने चाहत्यांच्या मनत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून मराठीतील उत्तम अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अप्रतिम अभिनेता उमेश कामत यांनी कित्येक वर्षांनंतर छोट्या पडदयावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हि एक पर्वणीच होती. मालिकेत उमेश आणि मुक्ताची जोडी खूपच पसंत केली जात आहे. दरम्यान सोनी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुक्ताने उमेशची एक छोटीशी मजेशीर मुलखात घेतली आहे. मुलाखतीमध्ये मुक्ताने उमेशला तब्बल ३५ प्रश्न विचारले आहेत. त्यातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आम्ही आपल्याला सांगणार आहोत. या प्रश्नांमध्ये उमेशने आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडपासून पहिल्या कमाईपर्यंत सर्व उत्तरे दिली आहेत. (हे वाचा:Hotness Overload! सोज्वळ गायत्री दातारचा बोल्ड अवतार) मुक्ताने उमेशला विचारले असे प्रश्न- १) तुझी पहिली कमाई किती होती? यावर उमेशचं उत्तर होतं ५० रुपये २) तुझी पहिली गर्लफ्रेंड कधी होती? उमेशने उत्तर देत म्हटलं, पोस्ट ग्रॅज्युएशनला असताना. या उत्तरावर मुक्ता मोठमोठ्याने हसू लागते. (हे वाचा:हातात तोडे आणि भरजरी लेहंगा, 'देवमाणूस'च्या डिम्पलचा साजशृंगार पाहून चाहते घायाळ) ३)मुंबईबद्दल काय आवडतं? यावर उमेशनं क्षणार्धात सांगितलं स्पिरिट. ४)तुझं आवडतं गाणं कोणतं ? उमेशचं आवडतं गाणं आहे, 'तेरा मुझसे है पेहले का नाता कोई' ५) तुझी आवडती डिश कोणती? उमेशला पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी हे चौपाटी पदार्थ अत्यंत प्रिय आहेत. अशा पद्धतीचे एकूण ३५ प्रश्न मुक्ताने उमेशला या व्हिडीओमध्ये विचारले आहेत. यावरून आपल्याला उमेश कामतबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहिती होतील.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Mukta barve