10 मार्च : अभिनेत्री मुक्ता बर्वे ही 'बंदिशाळा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मुक्ता एका धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच मुक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने नुकतीच BMW R 1250 ही बाईक खरेदी केलीये. या बाईकचा फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केलाय. शाहिदच्या या नव्या बाईकची किंमत 18 लाख 25 हजार रुपये आहे. अभिनेता गोविंदाचा सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर १'चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरूण धवनसोबत सारा अली खान दिसण्याची शक्यता आहे.