मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नेहा-आदित्यच्या लग्नात मोठा ट्वीस्ट, उदित नारायण यांच्या खुलाशानं चाहत्यांना धक्का

नेहा-आदित्यच्या लग्नात मोठा ट्वीस्ट, उदित नारायण यांच्या खुलाशानं चाहत्यांना धक्का

आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

मुंबई, 11 फेब्रुवारी : नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. हे दोघं येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी नेहाचा लग्नाच्या चुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची बातमी खरी असल्याचं चाहत्यांना वाटत असतानाच आता त्यांच्या लग्नात नवा ट्वीस्ट आला आहे. आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे या दोघांच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.

नेहा आणि आदित्यच्या लग्नाला आता अवघे 3 दिवस बाकी असताना आदित्यचे वडील उदित नारायण यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता नेहा आणि आदित्यच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नेहा माझ्या घरची सून झाली तर मला आनंदच आहे कारण एक फिमेल सिंगर माझ्या घरात येईल असं त्यांनी म्हटलं होतं पण आता त्यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याच बरोबर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं देखील स्पष्ट केलं.

'दीपवीर नेमके आहेत कुठे?', दीपिकाच्या विचित्र पोस्टमुळे फॅन्स संभ्रमात

बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितलं, नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत. हे केवळ इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं. कारण या शोमध्ये नेहा जज तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. जर नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर खऱ्या असत्या तर मला नक्की आनंद झाला असता.

शाहरुखला अबराहमने मारली किक, किंग खानची हालत झाली खराब! PHOTO VIRAL

उदित जी पुढे म्हणाले, ‘जर काही दिवसात आदित्यचं लग्न असतं तर आम्हाला नक्कीच माहित असतं आणि नेहा खूपच चांगली मुलगी आहे त्यामुळे तिला आमच्या घरची सून म्हणून स्वीकारायला मला नक्कीच आनंद होईल. पण या सर्व गोष्टी केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवण्यात आल्या होत्या.’ नेहा आणि आदित्यचं बीच साँग काही कारणानं 10 फेब्रुवारीला रिलीज होऊ शकलं नाही. याची माहिती नेहानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन देत चाहत्यांची माफी मागितली आहे.

भिडे-जेठालाल होणार व्याही? Valentineआधी तारक मेहता...'मध्ये येणार मोठा ट्वीस्ट

First published:

Tags: Aditya narayan, Bollywood, Neha kakkar