मुंबई, 10 फेब्रुवारी: या व्हॅलेंटाइन वीकमध्ये तारक मेहतामध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. टप्पू आणि सोनू यांच्या खास मैत्रीचं रुपांतर प्रेमात होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? तर दोन खास मित्र असलेला सोनू आणि टप्पूच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. 'तारक मेहता का उलटा चश्मा' मालिकेत जेठालालच्या आयुष्यात रोज नवीन संकट समोर उभी राहात आहेत. येणाऱ्या परिस्थितला तोंड देताना जेठालाल पुरता गांगारुन जातो. त्यातच सर्वांना आवडणारी जोडी म्हणजे टपू-सोनूची दोघंही एकदम खास मित्र आणि मस्तीखोर. आत्माराम भिडे यांनी आपल्या सोनूचं आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनूच्या लग्नासाठी वर शोधत असणारे भिडे थेट टपुच्या घरी पोहोचतात आणि चक्क जेठालालच्या मुलाचा हात सोनूसाठी मागतात. आत्माराम भिडे आपल्या मुलीसाठी जेठालालच्या मुलाचा हात मागतात.
हेही वाचा-‘तारक मेहता...’ मालिकेवर शोककळा, आणखी एका सदस्याचं निधन झाल्याने शूटिंग रद्द
या मालिकेत सध्या मॅजिक रिंगमुळे काय घडतंय ते दाखवलं जात आहे. बाघाने जेठालालला एक रिंग दिली आणि त्या रिंगमुळे त्याचं नशीब बदलेल असा विश्वासही दाखवला. आता हे आजमावण्यासाठी जेठालाल ही रिंग आपल्या हातात घालतो. गुरुवारीच्या घटनेत असे दिसून आले की टप्पू सेना सोसायटीच्या ग्राऊंडमध्ये क्रिकेट खेळत असताना टप्पू आत्माराम भिडेंची खिडकी फोडतो. भिडेंचा राग अनावर होतो आणि ते टप्पूची तक्रार करण्यासाठी जेठालालचं घर गाठतात. मात्र जेठालालना पाहून भिडे एकदाम शांत होतात आणि चक्क आपल्या मुलीसाठी म्हणजे सोनूसाठी जेठालालच्या मुलाचा हात मागतात. हे ऐकून जेठालालला खूप आनंद होतो. दोघंही लहान आहेत आणि दोन्ही घरांकडून हे लग्न मान्य असेल तर आपण त्यांचं थोडे मोठे झाल्यावर लग्न करू असं भिडे आणि जेठालाल ठरवतात.
आता प्रश्न आता आहे की जादुई अंगठीची ही कमाल आहे की काही गोलमाल आहे? हे समजण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या जेठालाल आनंद साजरा करत आहे. त्याच्या आनंदावर वीरजण पडणार की नाही हे येत्या काळात समजेल.
हेही वाचा-रिंकू राजगुरू देतेय बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर, एका सिनेमासाठी घेते एवढे पैस
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.