Home /News /entertainment /

लग्नाच्या भीतीने घर सोडलं, प्रेमप्रकरणही गाजलं; आता 'काली'च्या पोस्टरवरुन वाद.. कोण आहे Leena Manimekalai?

लग्नाच्या भीतीने घर सोडलं, प्रेमप्रकरणही गाजलं; आता 'काली'च्या पोस्टरवरुन वाद.. कोण आहे Leena Manimekalai?

लीना मणिमेकलाई या पूर्वीही आपल्या डॉक्युमेंट्री फिल्म्समुळे वादात अडकली आहे. देवदासी प्रथेवर बनवलेली माथम्मा (Mathamma), दलित महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबत बनवलेली पराई (Parai) आणि धनुषकोडीमधील मच्छिमारांवर बनवलेली सेंगदाल (Sengadal) या तिच्या वादात अडकेल्या काही डॉक्युमेंट्री फिल्म्स.

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जुलै : सध्या ‘काली’ नावाची डॉक्युमेंट्री फिल्म भरपूर वादात अडकली आहे. दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई हिने (Leena Manimekalai) आपल्या या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर (Kaali Poster Controversy) काली मातेला सिगारेट ओढताना, आणि एका हातात LGBTQ चा झेंडा घेतलेलं दाखवलं आहे. मणिमेकलाई या पूर्वीही आपल्या डॉक्युमेंट्री फिल्म्समुळे वादात अडकली आहे. देवदासी प्रथेवर बनवलेली माथम्मा (Mathamma), दलित महिलांवर होणाऱ्या हिंसेबाबत बनवलेली पराई (Parai) आणि धनुषकोडीमधील मच्छिमारांवर बनवलेली सेंगदाल (Sengadal) या तिच्या वादात अडकेल्या काही डॉक्युमेंट्री फिल्म्स. या डॉक्युमेंट्री रिलीज करण्यासाठी तिला भरपूर संघर्ष करावा लागला होता. ज्याप्रमाणे तिचं करिअर संघर्षमय आहे, त्याचप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्यही (Leena Manimekalai ) संघर्षमय राहिलं आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लग्न टाळण्यासाठी घर सोडलं तमिळनाडू राज्यातील मदुराई शहराच्या दक्षिण भागात एका छोट्या गावात लीनाचा जन्म झाला. महाराजापुरम हे तिच्या गावाचं नाव होतं. तिचे वडील कॉलेजमध्ये लेक्चरर होते. त्या गावात अशी प्रथा होती, की एखादी मुलगी वयात आल्यानंतर काही वर्षांमध्येच तिचं लग्न तिच्या मामाशी लावून द्यायचं. लीनाचंही लग्न मामाशी ठरलं होतं. मात्र, लग्नाची तयारी सुरू असतानाच ती घर सोडून चेन्नईला पळून गेली. तिथे तिनी विकटन या तमीळ मॅगझिनमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तर, विकटनच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी लीनाच्या घरच्यांशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेतलं, आणि लीनाला त्यांच्या ताब्यात दिलं. यानंतर लीनानी कसंबसं आपल्या घरच्यांना लग्न टाळून पुढे शिक्षणासाठी तयार केलं. तमीळ डिरेक्टरशी प्रेमप्रकरण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना लीनाच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांचा पीएचडी थिसीस हा तमीळ डिरेक्टर पी. भारतीराजा (P. Bharatiraja) यांच्यावर होता. लीनाला त्या थिसीसला पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध करायचं होतं. त्यामुळे ती चेन्नईला पी. भारतीराजा यांना भेटण्यासाठी पोहोचली. त्यानंतर या दोघांचं प्रेमप्रकरण (Leena Manimekalai affair) सुरू झालं, आणि लोकांमध्ये याबाबत चर्चा होऊ लागली. लीनाच्या आईला हे समजताच तिनी अन्नत्याग केला, आणि लीनाला घरी परतण्यास सांगितलं. आईची प्रकृती आणखी बिघडू नये यासाठी लीनाने पी. भारतीराजा यांच्याशी असलेले संबंध तोडले आणि ती घरी परतली. आयटी कर्मचारी ते फिल्ममेकर लीनाने नंतर काही वर्षं आयटी क्षेत्रात नोकरी केली. नोकरीसाठी ती बंगळुरूमध्ये होती. यावेळी तिची ओळख टेलीफिल्ममेकर सी. जेरॉल्ड (C Jerrold) यांच्याशी झाली. त्यानंतर जेरॉल्डसोबत काम करण्यासाठी म्हणून तिने आधीची नोकरी सोडली. मात्र, तिथे तिने जास्त वेळ काम केलं नाही. पुढे तिनी एकामागे एक अशा बऱ्याच नोकऱ्या बदलल्या. अखेर, तिनी फ्रीलान्सर बनण्याचा निर्णय घेतला. सामाजिक मुद्द्यांवर फिल्ममेकिंग लीनाने फ्रीलान्सिंग करताना कित्येक सामाजिक मुद्द्यांवर डॉक्युमेंट्रीज (Leena Manimekalai films) बनवल्या. तिला समाजात, राजकारणात बदल घडवून आणायचा होता. 2002 साली तिने आपली पहिली डॉक्युमेंट्री (Leena Manimekalai documentaries) फिल्म मथम्मावर काम करणं सुरू केलं. यानंतर तिनी आतापर्यंत मागे वळून पाहिलं नाही. फ्रीलान्सिंगमध्ये कमावलेले सर्व पैसे तिनी आपल्या फिल्म्समध्येच खर्च केले. या फिल्म्सना कित्येक अवॉर्ड, फेलोशिप मिळाल्या. कमवलेले सर्व पैसे प्रोजेक्टवर लावल्यामुळे कित्येक वेळा तिच्याकडे घरभाडं देण्यासाठीही पैसे उरत नसत. मात्र, तरीही तिनी फिल्ममेकिंग सुरूच ठेवलं. लीनाच्या पूर्वीच्या फिल्म्स वादात असतानाच, आता ‘काली’ ही डॉक्युमेंट्री फिल्मदेखील वादात अडकली आहे. हा वाद एवढा वाढला आहे, की कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाने याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. तसंच सोशल मीडियावरदेखील लीना मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
    First published:

    Tags: Film

    पुढील बातम्या