मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ बायकोच्या प्रश्नावर अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान

‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ बायकोच्या प्रश्नावर अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान

ट्विंकल खन्नानं त्याला तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस का असा प्रश्न विचारला. त्यावर अक्षयनं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच अभिमान वाटेल.

ट्विंकल खन्नानं त्याला तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस का असा प्रश्न विचारला. त्यावर अक्षयनं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच अभिमान वाटेल.

ट्विंकल खन्नानं त्याला तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस का असा प्रश्न विचारला. त्यावर अक्षयनं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच अभिमान वाटेल.

मुंबई, 29 मार्च : तुमच्या कठीण काळात जो तुम्हाला साथ देतो तोच खरा देव असतो असं म्हटलं जातं. अभिनेता अक्षय कुमारनं हे त्याच्या कृतीतून सिद्ध केलं. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या समस्येसाठी अक्षय कुमारनं पंतप्रधान मदत निधीमध्ये 25 कोटी रुपये दान करून सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आतापर्यंत जेव्हाही देशावर काही ना काही संकट आलं आहे. प्रत्येक वेळी अक्षय लोकांच्या मदतीसाठी धावून आला आहे. पण नुकतेच त्यानं जेव्हा 25 कोटी दान केले त्यावेळी त्याच्या बायकोनं म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल खन्नानं त्याला तू खरंच एवढे पैसे दान करणार आहेस का असा प्रश्न विचारला होता. त्यावर अक्षयनं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच अभिमान वाटेल.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाला पती अक्षयनं घेतलेल्या या निर्णयाचा खूप अभिमान वाटतो. तिनं नुकतंच अक्षयसाठी एक ट्वीट केलं. ज्यात तिनं तिला अक्षयचा अभिमान का वाटतो हे सांगितलं आहे. ट्विंकलनं तिच्या ट्वीटमध्ये लिहिलं, माझ्या या व्यक्तीचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा मी त्याला विचारलं की तू खरंच एवढी मोठी रक्कम दान करणार आहेस का? त्यावर त्यानं उत्तर दिलं, जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. मी स्वतः काहीही नव्हतो. पण आज मी या जागी आहे. जिथे माझ्याकडे सर्वकाही आहे. मग अशा वेळी मी ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना काहीतरी देत असताना मागे-पुढे का पाहावं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करत आहे ज्यांकडे आज काहीच नाही.

'रामायण'च्या पुनर्प्रक्षेपणावर TV अॅक्ट्रेस कविता कौशिकने केलं वादग्रस्त ट्वीट

शनिवारी म्हणजे 28 मार्चला अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटरवरुन त्यानं 25 कोटी रुपये कोरोनाग्रस्तांसाठी दान केल्याचं सांगितलं होतं. त्यानं लिहिलं, ‘आज अशी वेळ आहे की आपल्या सर्वांचं जीवन धोक्यात आहे. कोणासाठी काही करावं यासाठी हिच योग्य वेळ आहे. मी माझ्या बचतीतून 25 कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत आहे. चला जीव वाचवूया’ अक्षयचं हे ट्वीट रिट्वीट करत पीएम मोदींनी त्याचं कौतुक केलं होतं.

क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरू, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट

SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह

First published:

Tags: Akshay Kumar, Twinkle khanna