जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह

SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह

SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीची दर 48 तासांनंतर टेस्ट करण्यात येते. यात तिसऱ्या वेळीही कनिकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसची लागण झालेली एकमेव भारतीय सेलिब्रेटी कनिका कपूर सध्या लखनऊच्या पीजीआई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कनिकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर सगळीकडेच खळबळ उडाली होती. करण ती कोरोना टेस्ट होण्याआधी 4 हायप्रोफइल पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे जेव्हा तिला कोरोना झाल्याचं समजलं तेव्हा तिला अटक करण्याची मागणी सुद्धा सोशल मीडियावर करण्यात आली होती. कनिकाची दुसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या वेळीही कनिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीची दर 48 तासांनंतर टेस्ट करण्यात येते. कनिकाची याआधी केलेल्या दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता तिची तिसरी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता तिच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. तिच्यावर याआधी लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याबाबत FIR दाखल करण्यात आली आहे. ‘आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही’ असं का म्हणतायत सेलिब्रेटी

जाहिरात

दरम्यान कनिकानं ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्या हॉस्पिटलच्या मॅनजमेंटनं कनिकावर कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. कनिकाला एक कोरोना पेशंटला मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळत असतानाही ती हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं त्रास देत असते. तसेच तिला नेहमीच सेलिब्रेटी सारखी वागणूक हवी असते. ज्यामुळे हॉस्पिटलचे कर्मचारी त्रासल्याचं मॅनेजमेंटनं म्हटलं होतं. ‘तू मला भेटलास ना एकदा की, मग तुझी खैर नाही…’ महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी

दुसरीकडे कनिकानं एका न्यूज चनेलशी बोलताना हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी आपल्याला त्रास देत असल्याचं म्हटलं होत. ज्यात तिनं हॉस्पिटलमध्ये खाण्यापिण्यातची योग्य सोय नसल्याचं म्हटलं होतं. तसेच जेवणाची अशी परिस्थिती असेल तर मग उपचार कसे होणार असा सवालही उपस्थित केला होता. याशिवाय हॉस्पिटलमधील डॉक्टर आपल्याला धमकी देत असल्याचंही तिनं म्हटलं होतं. कोरियन वेब सीरिजने 2018 मध्येच केली होती Coronavirus ची भविष्यवाणी, पाहा Video

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात