मुंबई, 29 मार्च: टीव्ही मालिका FIR फेम कविता कौशिक हिने ट्वीट करुन दुरदर्शनवर पुनर्प्रक्षेपित करण्यात येत असलेल्या जुन्या 'रामायण' मालिकेवर सवाल उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर तिने देशातील राजकीय नेत्याबाबत वादग्रस्त टिप्पणीही केली आहे. मात्र, कविताच्या ट्वीट इतर यूजर्सनी नाराजी व्यक्त करत तिची जोरदार खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा..'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रसारण, अमोल कोल्हे यांची FB पोस्ट
शनिवारपासून (28 मार्च) 80 च्या दशकातील ऐतिहासिक मालिका 'रामायण'चे दुरदर्शनवरून पुनर्प्रक्षेपण करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी केलेल्या मागणी नंतर रामायण मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षक आनंद व्यक्त करत असताना टीव्ही अॅक्ट्रेस कविता कौशिकने ट्वीट करुन रामायणाच्या पुनर्प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्यही केलं आहे. मात्र, यूजर्सने कविताच्या या ट्वीटवरुन तिला ट्रोल केलं आहे.
काय म्हणाली कविता कौशिक?
'स्वत: संसदेत बसून मोबाईलवर पॉर्न पाहातात आणि आम्हाला रामायण बघण्यास सांगतात', असं ट्वीट कविताने केलं आहे. तिच्या या ट्वीटवर इतर यूजर्सने तिला ट्रोल केलं आहे. एक यूजरने म्हटलं की, कृपया पोलिसांनी कविताला तत्काळ अटक करावी. तिने रामायणाची तुलना पॉर्नशी केली आहे. आता सहन करणार नाही. आता मुद्दा धर्माचा आहे. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, 'मोबाईलवर तर तू काहीही पाहू शकते. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे. कविता कौशिक हिनेही ट्रोलर्सवर पलटवार केला आहे.
Khud toh parliament mei baith ke phone pe porn dekhte hai, humko Ramayan dekhne ko keh rahe hai
— Kavita (@Iamkavitak) March 28, 2020
गेल्या काही दिवसांपूर्वी पतीसोबत घेतलेल्या एक सेल्फीवरून कविता कौशिक चर्चेत आली होती. कविताने एक सेल्फी ट्वीट केला होता. त्यात कविताचा पती भांडे धुताना दिसत होता. त्यावरुन युजर्सनी तिला ट्रोल केलं होतं.
हेही वाचा..SHOKING! कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, तिसरी कोरोना टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह
दरम्यान, दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी या काळात नागरिकांच्या मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणल्या जात आहेत. दूरदर्शनवर शनिवारपासून "रामायण", "महाभारत", "व्योमकेश बक्षी" आणि "सर्कस" या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीनेही आपली लोकप्रिय मालिका "स्वराज्यरक्षक संभाजी" पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.