VIDEO : क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरूच, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट

VIDEO : क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरूच, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट

कोरोनामुळं सर्व क्रिकेट सामने रद्द झाल्यामुळं विराट सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. त्याच्याबरोबर पत्नी अनुष्का शर्माही घरीच आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : कोरोनामुळे भारतात सध्या लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेबरोबरच सेलिब्रिटीही घरात कैद आहेत. एकीकडे कोरोनामुळं सर्व क्रिकेट सामने रद्द झाल्यामुळं विराट सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. त्याच्याबरोबर पत्नी अनुष्का शर्माही घरीच आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरून दोघंही आपले व्हिडीओ शेअर करत असतात. आता तर विराटसाठी चक्क अनुष्का हेअरस्टायलिस्ट झाली आहे. याचा व्हिडीओ अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटचे केस कापताना दिसत आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये विराट, क्वारंटाईनमध्ये तुम्हाला काय करावे लागते बघा, असे बोलत आहे. यावर अनुष्का, स्वयंपाकघरातल्या कात्रीने केस कापणे, या अशा अशा गोष्टी आवडतात, असे उत्तर विराटला दिले. अखेर शरणागती पत्करत विराट शेवटी. माझ्या बायकोने सुंदर केस कापले आहेत, असेही म्हणतो.

वाचा-कोरोनाशी लढाईत भारतीय नाही तर परदेशी खेळाडू आघाडीवर, अब्जाधीशांनी केली इतकी मदत

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

Meanwhile, in quarantine.. 💇🏻‍♂💁🏻‍♀

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

वाचा-Coronavirus : दान केलेल्या रकमेवरून धोनी ट्रोल! साक्षी म्हणाली,'लाज वाटते'

याआधी विराट आणि अनुष्काने कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र विराटनं अद्याप कोरोनाग्रस्तांना मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळं चाहत्यांनी विराटवर टीका केली होती.

वाचा-वर्षाला 800 कोटी कमवणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांना दिले फक्त 1 लाख, चाहते भडकले

कोरोनामुळं सध्या क्रिकेट सामने रद्द झाले आहेत, त्यामुळं विराटसह इतर खेळाडूही घरी आहेत. दरम्यान विराटला न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. एकाही कसोटी सामन्यात त्याला अर्धशतकी खेळी करता आली नाही. विराट आयपीएलसाठी सज्ज होता, मात्र कोरोनामुळं 15 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा वाढता धोका पाहता, आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2020 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading