Home /News /entertainment /

Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण

Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कोरोना, गोकुळधाममध्ये चिंतेचं वातावरण

अभिनेत्री प्रिया आहूजा राजदा (Priya Ahuja Rajda) इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

  मुंबई, 30 सप्टेंबर : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेय या मालिकेमध्ये दिसणारी रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजा राजदा (Priya Ahuja Rajda) कोरोना पॉझिटिव्ह आहे. प्रिया आहूजाने याबाबत स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या जेठालालसह अनेक कलाकारांनी देखील ती लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना केली आहे. प्रिया आहूजा राजदा (Priya Ahuja Rajda) ने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यासह एक लांबलचक पोस्ट देखील लिहीली आहे. या नोटमध्ये तिने लिहिले आहे की, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि याबाबत मी तुम्हाला सूचित करणे माझे कर्तव्य आहे. माझ्यात व्हायरसचे कोणतेही लक्षण नाही आहे. जे कुणी गेल्या 2-3 दिवसात माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. मी आतापर्यंत घरीच होते आणि शूटिंग देखील करत नव्हते तरी देखील मला कोरोना झाला. स्वत:ला सुरक्षित ठेवा आणि मास्क घालण्यास विसरू नका.' (हे वाचा-मुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी)
  मुंबई महापालिकेने दिलेल्या सर्व सूचना आपण फॉलो करत असल्याचेही यावेळी प्रियाने म्हटले आहे. प्रिया आहूजाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. या मालिकेतील तिचे सहकलाकार जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी म्हटले आहे की, 'तू लवकर बरी व्हावीस यासाठी प्रार्थना करेन. काळजी घे. तू लवकरच ठीक होशील.' (हे वाचा-'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर) त्याचप्रमाणे समय शाह, झील मेहता यांनी देखील तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. प्रिया आहूजाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगा अरदासला जन्म दिला होता. त्यानंतर ती मॅटर्निटी लीव्हवर आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Coronavirus, Tarak mehta ka ooltah chashmah, Television

  पुढील बातम्या