मुंबई, 30 सप्टेंबर : दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) अडचणीत वाढ झाली आहे. अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी समन बजावला आहे. अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) अनुराग कश्यपविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्याासाठी वर्सोवा पोलिसांनी अनुराग कश्यपला समन बजावला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपला गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
Mumbai Police summons film director Anurag Kashyap (in file photo) asking him to appear at Versova Police station tomorrow at 11 am, in connection with the alleged sexual assault against actor Payal Ghosh. pic.twitter.com/JLnlgO6Pzb
— ANI (@ANI) September 30, 2020
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाचा खळबळजनक आरोप केला. नशेत अनुरागने आपल्यासह जबरदस्ती केल्याचं ट्वीट तिने केलं. वर्सोवा पोलीस ठाण्यात पायलने अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनुरागविरोधात कारवाई केली नाही तर उपोषण करेन, असा इशाराही पायल घोषने दिला होता. 19 सप्टेंबरला पायलने ट्वीट करून अनुरागवर आरोप केले होते. 22 सप्टेंबरला तिनं वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. (हे वाचा- ‘काळी’ म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर) अभिनेत्री पायल घोषने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये अनुराग कश्यप विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने गंभीर आरोप करत अनुरागविरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. (हे वाचा- मृत्यूआधी अभिनेत्याने केला शेवटचा कॉल, वडिलांशी व्यवस्थित बोलला पण त्यानंतर…) दरम्यान या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत पायल घोषच्या पाठिशी उभी राहिली. तर अनुरागला अनेक अभिनेत्रींनी पाठिंबा दिला होता. पायल घोषला काहींनी समर्थन केले तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अनुरागच्या बाजुने त्यांची मत सोशल मीडियावर व्यक्त केली. अगदी अनुरागच्या पूर्वपत्नींनी देखील त्याला पाठिंबा दिला. पायलने सोशल मीडियावर यानंतर अनेक पोस्ट केल्या आहेत. ती असुरक्षित असल्याचंही तिने म्हटलं होते. ‘इंडिया, मी जर छताला लटकलेली सापडले तर लक्षात ठेवा. मी आत्महत्या केली नसेन. त्यांच्याकडे नैराश्य आणि मेडिकेशनची कहाणी तयार आहे’, अशी पोस्ट करत तिने तिच्या हत्येबाबत भीती व्यक्त केली होती.