मुंबई, 30 सप्टेंबर : किंग खान शाहरूख (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती विविध पोस्ट शेअर करत असते, मात्र तिला अनेकदा द्वेषपूर्ण कमेंट्समुळे ट्रोल केले जाते. दरम्यान या साऱ्याला कंटाळून सुहानाने एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने ट्रोलर्सना चोख शब्दात उत्तर दिले आहे. यामध्ये तिच्या फोटोंवर आलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट तिने शेअर केले आहेत. रंगभेद संपवण्याचे आवाहन तिने या पोस्टमधून केले आहे. तिच्या पोस्टमधून तिने हा सर्व प्रकार थांबवला जावा याबाबत आवाहन केले आहे.
तिने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'सध्या खूप काही सुरु आहे आणि हा इश्यू लवकरच आपल्याला ठीक करायला हवा. हे केवळ माझ्याविषयी नाही आहे, तर ज्या तरुण मुलामुलींनी त्यांचे आयुष्य दडपणाखाली घालवले त्यांच्याविषयी आहे. या माझ्याविषयी करण्यात आलेल्या काही कमेंट्स आहेत. मी 12 वर्षांची असल्यापासून माझ्या रंगामुळे मला कुरुप बोलण्यात आले, तेही प्रौढ स्त्री आणि पुरुषांकडून.'
(हे वाचा-सुशांतच्या अंत्यसंस्काराचा VIDEO पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली...)
तिने तिच्या या पोस्टमध्ये #endcolourism असा हॅशटॅग वापरून असे म्हटले आहे की, 'या सर्व प्रौढ व्यक्ती आहेत याशिवाय वाईट हे आहे की ते सर्व भारतीय आहेत, म्हणजेच आम्ही सर्व 'Brown' आहोत- हो आमच्यामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही या Melanin पासून तुम्ही स्वत:ला वेगळे करू शकत नाही. स्वत:च्या माणसांचा द्वेष करणे याचा अर्थ एवढाच होतो की तुम्ही किती वेदनादायकरित्या असुरक्षित आहात'
(हे वाचा-नोरा फतेहीला 'चुकीच्या' ठिकाणी स्पर्श केल्याच्या आरोपाबाबत टेरेन्सचं स्पष्टीकरण)
सुहानाने ती स्वत: जशी आहे त्याबाबत ती आनंदी असल्याचे म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, 'मला माफ करा जर सोशल मीडिया, इंडियन मॅचमेकिंग किंवा तुमच्या स्वत:च्या कुटुंबाने तुम्हाला असे पटवून दिले असेल की जर तुमची उंची 5'7 नाही किंवा तुम्ही गोरे नाहीत तर तुम्ही सुंदर नाही आहात. मी 5'3 आणि ब्राऊन आहे आणि मी याबाबत अत्यंत आनंदी आहे आणि तुम्हाला देखील हे माहित असणे गरजेचे आहे.
शाहरुखप्रमाणे सुहानाला देखील अभिनय क्षेत्रात तिचा ठसा उमटवायचा आहे. सध्या ती अभिनयाचे धडे गिरवत आहे. तिने इंग्लंडच्या Ardingly College मध्ये फिल्स स्टडी पूर्ण केले आहे. तर सध्या न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये ती शिक्षण घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shahrukh khan daughter, Suhana khan, Suhana khan photos