जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बँक कॅशियर ते एसीपी प्रद्युमन; अभिनेते शिवाजी साटम यांचा थक्क करणारा प्रवास

बँक कॅशियर ते एसीपी प्रद्युमन; अभिनेते शिवाजी साटम यांचा थक्क करणारा प्रवास

बँक कॅशियर ते एसीपी प्रद्युमन; अभिनेते शिवाजी साटम यांचा थक्क करणारा प्रवास

अभिनेते शिवाजी साटम (shivaji satham) आज आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल : ‘कुछ तो गडबड है दया’ असं म्हणताच तुमच्यासमोर उभे राहतात ते छोट्या पडद्यावरील ‘सीआयडी’ (CID) या शोमधील एसीपी प्रद्युमन (Acp Pradyuman). एसीपी प्रद्युमन म्हणजे अभिनेते शिवाजी साटम (shivaji satam birthday) यांचा आज वाढदिवस आहे. शिवाजी साटम आज आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत.त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांना अगदी लहान मुलंसुद्धा एसीपी प्रद्युमन या नावानेच ओळखतात. मात्र शिवाजी साटम सुरुवातीला एका सेन्ट्रल बँकेत कॅशियर (central bank ) म्हणून काम करत होते. सुरुवातीपासूनच शिवाजी साटम यांचा कल थिएटरकडे होता. याच आवडीमुळे त्यांनी नोकरीसोबतच अभिनयाचे धडे घ्यायलाही सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी संगीतमय नाटक ‘ संगीत वरद’ मध्ये अभिनय केला होता. यावेळी मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते बाळ धुरी यांनी त्यांच्यातील अभिनयाची खुमक ओळखली.

जाहिरात

त्यांनी ‘संगीत वरद’ मधून नाटकांमध्ये प्रवेश केला. तर 1980 मध्ये ‘रिश्ते नाते’ या मालिकेमधून टीव्ही जगतात प्रवेश केला होता. तसंंच 1988 मध्ये त्यांनी आणखी एका मालिकेमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी वास्तव, कुरुक्षेत्र, नायक यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतसुद्धा काम केलं आहे. हे वाचा - ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं शूटिंग आता परराज्यात होणार? मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ या मालिकेतून. या मालिकेतील ‘एसीपी प्रद्युमन’ या भूमिकेने ते घराघरात पोहोचले. मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत त्यांना प्रद्युमन म्हणूनच ओळखलं जातं. 22 वर्षे या मालिकेने लोकांचं मनोरंजन केलं आहे. टीव्हीवरील सर्वात जास्त चाललेला कार्यक्रम म्हणून याकडे पाहिलं जातं. प्रद्युमनची स्टाईल खूपच प्रसिद्ध झाली होती. एक भुवई वर करून हातांच्या हालचाली करत डायलॉग बोलणारे एसीपी प्रद्युमन अनेकांना आवडतात. कुछ तो गडबड है’ आणि ‘दया तोड दो दरवाजा’ हे त्यांचे डायलॉग खूपच प्रसिद्ध झाले आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर त्यांचे अनेक मिम्स सुद्धा तयार केले आहेत. हे वाचा -  ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं शूटिंग आता परराज्यात होणार? अशा या मराठमोळ्या अष्टपैलू अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात