'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचं शूटिंग आता परराज्यात होणार?

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचं शूटिंग आता परराज्यात होणार?

नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ (fulala gandh maticha) मालिकेतील अभिनेत्री समृद्धी केळकरने (samruddhi kelkar) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (instagram story) एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात सर्व टीम एयरपोर्टवर दिसून येत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : कोरोनाचा (coronavirus) विळखा दिवसेंदिवस वाढत आहे आणि चिंतेची बाब म्हणजे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात (maharashtra) आहेत. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनसारख्या (lockdown) कडक निर्बंधांचा पर्याय निवडला. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवांवर निर्बध घालण्यात आले आहेत. याच फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसतो आहे. शूटींगवर निर्बंध आले आहेत. म्हणून मालिका आणि चित्रपटांचे कलाकार शूटिंगसाठी (serial shooting) बाहेरील राज्यात जात आहेत. नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ (fulala gandh maticha) या मालिकेतील अभिनेत्री समृद्धी केळकरने (samruddhi kelkar) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (instagram story) एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात सर्व टीम एयरपोर्टवर दिसून येत आहे.

गेली वर्षभर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. त्यामुळे वर्षभर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र होतं. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं म्हटलं जातं आहे आणि याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढत आहे. आणि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कठोर निर्बंध घातले. त्यामुळे महाराष्ट्रात शूटिंगवरसुद्धा बंदी आली आहे. त्यामुळे शूटिंगसाठी बाहेरील राज्यांचा पर्याय अवलंबला जात आहे.

लॉकडाऊनमुळे जवळजवळ वर्षभर शूटिंग बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता काही मोजक्याच राज्यांनी असे कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कलाकार शूटिंगसाठी इतर राज्यात जात आहेत.

हे वाचा - Shocking! गोविंदाची भाची करणार होती आत्महत्या; या कारणामुळे वाचलं आयुष्य

नुकतीच मराठी मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील अभिनेत्री नम्रता केळकरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यामध्ये मालिकेची पूर्ण टीम एयरपोर्टवर उभी होती. आणि दुसऱ्या एका पोस्टमध्ये विमान उड्डाणासाठी तयार असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावर बाय बाय असं कॅप्शन देखील होतं. यावरूनच ही टीम शूटिंगसाठी दुसऱ्या राज्यात गेल्याचं समजतं. याआधीसुद्धा अनेक मालिकेचे कलाकार हैदराबाद, रामोजी फिल्मसिटीमध्ये रवाना झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच मालिका न थांबता आपल्याला बघायला मिळणार आहेत.

Published by: Aiman Desai
First published: April 21, 2021, 9:23 AM IST

ताज्या बातम्या