सिद्धार्थबद्दल वक्तव्य करणं शिल्पाच्या अंगलट, #ShilpaTrophyVapasKaro हॅशटॅगचा ट्रेंड

सिद्धार्थबद्दल वक्तव्य करणं शिल्पाच्या अंगलट, #ShilpaTrophyVapasKaro हॅशटॅगचा ट्रेंड

बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लावर शिल्पा शिंदेने गंभीर आरोप केल्यानंतर आता सिद्धार्थचे फॅन्सने शिल्पावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई. 18 फेब्रुवारी : नुकतचं बिग बॉस 13चा फिनाले पार पडला. आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 13चा विजेता झाला. बिग बॉसचा यंदाचा सीझन वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय सीझन ठरला. बिग बॉसच्या आतापर्यंतचा सर्वाधिक बघितला जाणारा आणि लोकप्रियता प्राप्त झालेला हा सीझन होता. हा सीझन लोकप्रिय करण्यात सर्वात महत्वाचा वाटा होतो तो सीझनमधील सर्वच स्पर्धकांचा. यावर्षीच्या स्पर्धकांमुळेही यंदाचा सीझन गाजला.

काही दिवसापूर्वी बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदेनी सिद्धार्थ शुक्लावर गंभीर आरोप केले होते. बिग बॉसच्या 13 च्या फिनालेच्या एक दिवस आधी शिल्पाने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याचा खुलासा केला होता. शिल्पाने सांगितलं होतं की, नात्यात असताना सिद्धार्थ शिल्पासबोबत वाईटपद्धतीने वागणूक करत असे. तर अनेकदा सिद्धार्थने आपल्याला मारहाण केल्याचंही शिल्पाने सांगितलं. मात्र शिल्पाच्या या वक्तव्यानंतर सिद्धार्थचे फॅन्स चांगलेच भडकलेत. सिद्धार्थच्या फॅन्सनी सोशल मीडियावर #ShilpaTrophyVapasKaro असा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. सिद्धार्थवर गंभीर आरोप केल्याने सिद्धार्थच्या फॅन्सनी शिल्पाला तिची बिग बॉस 11 ची ट्रॉफी परत देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिताने पुन्हा शेअर केला HOT फोटो, चाहते घायाळ

#ShilpaTrophyVapasKaro हा हॅशटॅग सोशल मीडियावर खूप ट्रेंडिंग आहे. इतकच नाही तर हा हॅशटॅग सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. अनेक फॅन्सनी शिल्पाच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर शिल्पा खोटे आरोप करत असल्याचंही चाहत्यांनी म्हटलं आहे. शिल्पाने आरोपांसोबतच सिद्धार्थला मिळालेल्या बिग बॉसच्या ट्रॉफीवरही टीका केली. ती म्हणाली की, “ मला वाटत नाही की सिद्धार्थ सारखा व्यक्ती हा शो जिंकावा. त्याच्यासारख्या माणसाने शो जिंकण ही चिंतेची बाब असू शकते. आणि असं झालं तर फारचं वाईट होईल. त्याच्यात शो जिंकण्याची कुवत नाही.”

तर बिग बॉस 13च्या फिनालेनंतर सिद्धार्थनेही शिल्पाच्या या आरोपांवर वक्तव्य केलं होतं. सिद्धार्थ म्हणला, शिल्पाला आपण खूप चांगले ओळखत असून तिने अशाप्रकारे का आरोप केले याची आपल्याला काहीच माहिती.

हेही वाचा-'लँड करा दे...' VIRAL व्हिडीओतील तो घाबरलेला तरुण रिअॅलिटी शोमध्ये

शिल्पाची हे आरोप ऐकून सिद्धार्थचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. आणि हॅशटॅग जास्तीत जास्त व्हायरल करून शिल्पाला बिग बॉस 11ची ट्रॉफी परत करायला सांगत आहेत. शिल्पा शिंदे बिग बॉसचा 11वा सीझन जिंकली होती. त्यावेळी शिल्पाने तो सीझन गाजवला होता. फिनालेमध्ये अभिनेत्री हिना खानला मागे टाकत शिल्पाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती.

First published: February 18, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या