मुंबई, 17 फेब्रुवारी : सलमान खान (Salman Khan)चा शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss)मध्ये पंजाबची कटरिना कैफ (Punjab Ki Katrina Kaif) म्हणून प्रसिद्ध झालेली पंजाबी गायिका शहनाज गिल (Shehnaaz Gill) आता लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून एक दिवस नाही झाला आहे तोच शहनाज आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. यामध्ये शहनाज सहभागी प्रतिस्पर्ध्यांमधून स्वत:साठी नवरदेव शोधणार आहे. शहनाज की शादी (Shehnaaz Ki Shaadi) असं या कार्यक्रमाचं नाव असून आजपासूनच हा शो कलर्सवर सुरू होणार आहे. यामध्ये बोहल्यावर चढण्यासाठी अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
Kuch aise liya @shehnazshines ne apne aashiqon ka test, to check whether they are the best. 🤔
— ColorsTV (@ColorsTV) February 17, 2020
Dekhiye kis ko puchengi woh #MujhseShaadiKaroge, aaj raat se, Mon-Fri raat 10:30 baje sirf #Colors par pic.twitter.com/27Xyt81Hz9
शहनाजबरोबर लग्न करण्यासाठी अनेकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र यातील एक चेहरा पाहून तुम्हाला असं वाटेल ‘अरे, याला कुठेतरी पाहिलं आहे…’ तर हा मुलगा आहे विपिन साहू, जो नुकताच एका पॅराग्लायडिंगच्या व्हायरल व्हिडीओमधून प्रसिद्ध झाला होता. विपिनला पॅराग्लायडिंग करायला सुरूवात केल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याला उंचीची भीती वाटले. यामध्ये त्याने खूप साऱ्या शिव्या देखील दिल्या होत्या. काही काळातच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर अनेक मीम्स देखील बनले होते. तर हाच विपिन शहनाजबरोबर लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे.
*boards flight for the first time*
— ex. capt (@thephukdi) August 26, 2019
*little turbulence happen*
me to pilot: pic.twitter.com/BSJgww9NsZ
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीष पॉल करणार आहे. टीआरपीच्या रेसमध्ये हा कार्यक्रम किती पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल