जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिताने पुन्हा शेअर केला HOT फोटो, चाहते घायाळ

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिताने पुन्हा शेअर केला HOT फोटो, चाहते घायाळ

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिताने पुन्हा शेअर केला HOT फोटो, चाहते घायाळ

तारक मेहता का उल्टा चश्मामधील बबिताने तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांकडून या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 फेब्रुवारी : सध्य़ाच्या धावपळीच्या जीवनात प्रेक्षक विरंगुळ्यासाठी विविध टिव्ही मालिका, कॉमेडी शो, वेबसिरीजचा पर्याय निवडतात. सध्या अनेक कॉमेडी शो आणि मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रत्येक भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आली आहे. ते जेठालाल असोत, दया बेन असो किंवा टप्पू असे अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच मालिका सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत या मालिकेची प्रेक्षकांमध्ये असलेली लोकप्रियता टिकून आहे. मालिकेमधील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेवर जितकं प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. तितकच त्या कलाकारावरही प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. त्यातीलच लोकप्रिय असलेलं एक नाव म्हणजे बबिता. मालिकेत बबिता ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता ही तिच्या भूमिकेप्रमाणेच लोकप्रिय आहे. गेल्या 12 वर्षांपासून मुनमुन दत्ता तिच् या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. इतकचं काय तर शोमधील जेठालालही बबितावर इम्प्रेस आहेत. ही बबिता रिअल लाइफमध्ये खूप स्टायलिश आहे. आणि तिचा हा स्टायलिश आणि हॉट अंदाजाच्या चाहते प्रेमात आहेत. मुनमुन दत्ताने नुकताच तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने जमिनीवर झोपून पोज दिली आहे. मुनमुनने या फोटोत हॉट स्पार्कली ड्रेस घातला आहे. मुनमुनच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

जाहिरात

मुनमुनचा केवळ हा एकच फोटो नाही तर मुनमुनच सोशल मीडिया अकाऊंट हॉट फोटोंनी भरलेले आहेत. त्यामुळे मुनमुनचे नवनवीन फोटो बघण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मुनमुनचे इंस्टाग्रामवर 2.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

मुनमुनने 2004साली हम सब बाराती या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अभिनेत्री कमल हसन यांच्या मुंबई एक्स्प्रेसमध्येही मुनमुनने काम केलं आहे. तर 2006 साली अभिनेता अक्षय कुमारच्या हॉलिडे चित्रपटातही मुनमुन झळकली होती.

जाहिरात

मुनमुन केवळ अभियन क्षेत्रातच काम नाही करत नाही आहे तर ती सोशल वर्कमध्येही सक्रीय आहे. 2008 मध्ये मुनमुन अभिनेता अरमान कोहलीसोबत नात्यात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्याच वर्षी ते एकमेकांपासून वेगळे झाल्याचंही सांगण्यात येत होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात